नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मराठा सर्वेक्षणासाठी नियुक्त शिक्षकांना शाळेच्या कामातून सूट द्यावी किंवा शाळा सकाळी सत्रात भरवण्यास परवानगी देण्याची मुख्याध्यापक संघाची मागणी : सर्वेक्षणासाठी शिक्षक असलेल्याच शाळा सकाळच्या सत्रात घेण्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचना – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

मराठा सर्वेक्षणासाठी नियुक्त शिक्षकांना शाळेच्या कामातून सूट द्यावी किंवा शाळा सकाळी सत्रात भरवण्यास परवानगी देण्याची मुख्याध्यापक संघाची मागणी : सर्वेक्षणासाठी शिक्षक असलेल्याच शाळा सकाळच्या सत्रात घेण्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचना

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

मराठा सर्वेक्षणासाठी नियुक्त शिक्षकांना शाळेच्या कामातून सूट द्यावी किंवा शाळा सकाळी सत्रात भरवण्यास परवानगी देण्याची मुख्याध्यापक संघाची मागणी : सर्वेक्षणासाठी शिक्षक असलेल्याच शाळा सकाळच्या सत्रात घेण्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचना

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
मराठा सर्वेक्षणासाठी नियुक्त शिक्षकांना शाळेच्या कामातून सूट द्यावी किंवा शाळा सकाळी सत्रात भरवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने शिक्षणाधिकारी (माध्य.) डॉ. एकनाथ आंबोकर यांच्याकडे शिष्टमंडळाद्वारे करण्यात आली. यावेळी ज्या शाळेतील शिक्षक मराठा सर्वेक्षणासाठी नियुक्त असतील अशाच शाळा सकाळच्या सत्रात भरविण्यास परवानगी दिली असून ज्या शाळातील शिक्षक सर्वेक्षणासाठी नियुक्त नाहीत अशा शाळांनी नियमित वेळेत शाळा भरवाव्यात अशा सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळास दिल्या.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, महाराष्ट्र शासनाने सर्व जिल्हाधिकारी यांना मराठा सर्वेक्षण करणेबाबत आदेश दिलेले आहेत. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील शाळेतील शिक्षकांना मराठा सर्वेक्षण करण्याबाबत आदेश दिलेले आहेत. सर्वेक्षण करण्यासाठी काही शाळातील सर्व शिक्षकांना आदेश प्राप्त झालेले आहेत. तर काही ठिकाणी मुख्याध्यापकांनाही आदेश प्राप्त झाले आहेत. सर्वेक्षण करताना प्रत्येक शिक्षकाला १०० कुटुंबाचे सर्वेक्षण करायचे आहे. यामध्ये एका कुटुंबातील सर्वेक्षण करताना त्यांना १५० पेक्षाअधिक प्रश्न विचारायचे असल्याने अर्धा ते पाऊणतास वेळ लागणार आहे. त्यानुसार तशा नोंदी करायच्या आहेत. हे सर्व काम ८ दिवसात पूर्ण करायचे आहे. या दरम्यान चाचणी व पूर्व परीक्षा होत आहेत. त्यामुळे ज्या शिक्षकांना सर्वेक्षण करण्यासाठी आदेश मिळालेले आहेत त्यांना शालेय कामात सूट द्यावी किंवा शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली. याशिष्टमंडळात मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ, राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष व डी. बी. पाटील विचारमंचचे अध्यक्ष व्ही. जी. पोवार, शिक्षक नेते दादा लाड, मुख्याध्यापक संघाचे व्हा.चेअरमन मिलिंद पांगिरेकर, संचालक श्रीकांत पाटील, बबन इंदुलकर आदी सहभागी झाले होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930