नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मराठा आरक्षणासाठी आजपासून सर्व्हेक्षण सुरु : शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्यावर जबाबदारी – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

मराठा आरक्षणासाठी आजपासून सर्व्हेक्षण सुरु : शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्यावर जबाबदारी

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

मराठा आरक्षणासाठी आजपासून सर्व्हेक्षण सुरु : शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्यावर जबाबदारी

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
मराठा सर्वेक्षणाची प्रक्रिया आज मंगळवार पासून सुरू झाली असून ही प्रक्रिया आठ दिवस चालणार आहे. शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्यावर ही जबाबदारी दिली आहे. सर्वेक्षणासाठी शाळेतील शिक्षकांची नियुक्ती केल्याने ऐन परीक्षांच्या तोंडावरच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. तर महसूल विभागाचे काम ठप्प होणार आहे.
शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. समाजातील अर्थिक, सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी शिक्षकासह ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांची नेमणूक करण्यात आली आहे. शासन सातत्याने शिक्षकांना अवांतर कामे देत आहे. यामुळे या कामात शिक्षकांचा वेळ जात असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. तसेच शासन रोज नवनवीन प्रशिक्षण शिक्षकांना देत असल्याने शिक्षकांचे शाळेकडे व मुलांकडे दुर्लक्ष होत आहे त्यांच्यावर अवांतर कामाचा बोजा असताना मराठा समाजाच्या सर्वेक्षणाची जबाबदारी दिल्याने ‘विद्यार्थी शाळेत शिक्षक गावात’ अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. एका शिक्षकावर १०० कुटुंबाची सर्वेक्षण करण्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे शिक्षकांचा बहुतेक वेळ गावातच जाणार आहे. आधीच प्रत्येक शाळेत शिक्षकांची संख्या कमी आहे. त्यात शासनाची अवांतर कामे या सगळ्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकास होणार कसा ? अशी विचारणा होत आहे.
मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी विभागाचे कर्मचारी यांची नेमणूक केल्याने महसूल विभाग व गावगाडा ठप्प होणार आहे. शिक्षकांना अध्यापनाशिवाय शासनाने कोणतेही काम देऊ नये अशी मागणी पालक व शिक्षक संघटनांकडून होत आहे. अवांतर, अशैक्षणिक व सर्व्हेक्षणाची कामं समाजातील बेरोजगार तरूणांना मानधन तत्वावर देण्यात यावी अशीही मागणी होत आहे. सरसकट महसूल, कृषी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक यांची सर्वेक्षणासाठी नियुक्ती केल्याने सेवनिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना अँड्रॉइड मोबाईल व सर्वेक्षण अँप हाताळण्याचे कौशल्य असेलच असे नाही यामुळे त्यांच्यावर मानसिक ताण येणार आहे व काम वेळेत होईल की नाही याबाबत संभ्रमावस्था आहे.
…………………..
मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी ४५६ प्रगणक, २६ पर्यवेक्षक यांची नियुक्ती केली आहे. तलाठी, कृषी सहाय्यक, शिक्षक, ग्रामसेवक यांना प्रशिक्षण दिलं आहे. ३० जानेवारीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. आजपासून सर्वेक्षण सुरू होत आहे. तरी कर्मचाऱ्यांनी वेळेत सर्वेक्षण पूर्ण करावे.
– अश्विनी वरुटे-अडसूळ, तहसीलदार , भुदरगड
…………………
भुदरगड तालुक्यातील सुमारे ६१ शाळातील १०० टक्के शिक्षक मराठा सर्वेक्षण कामासाठी घेण्यात आले आहेत. अशा शाळा मुख्याध्यापक, शिक्षकांनी सर्वेक्षणाचे काम करता करता मुले स्वयं अध्ययन करतील व त्यांना शालेय पोषण आहार मिळेल अशी व्यवस्था करावी.
– दिपक मेंगाणे, गटशिक्षणाधिकारी, भुदरगड
………….
फोटो : बोगार्डेवाडी (ता. भुदरगड) येथे सर्वेक्षणला मंडल अधिकारी सुरेश जंगली यांनी भेट दिली यावेळी अजितकुमार बुडके, आनंदा आगम, सचिन गुरव, संभाजी पाटील व इतर

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728