नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जुन्या पेन्शनसह टप्पा अनुदानाचा अध्यादेश लवकरच काढणार : उपमुख्यमंत्री ना.अजित पवार – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

जुन्या पेन्शनसह टप्पा अनुदानाचा अध्यादेश लवकरच काढणार : उपमुख्यमंत्री ना.अजित पवार

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

जुन्या पेन्शनसह टप्पा अनुदानाचा अध्यादेश लवकरच काढणार : उपमुख्यमंत्री ना.अजित पवार

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
सरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व विनाअनुदानित शाळांना टप्पा अनुदान देणार, असा निर्णय नागपूर अधिवेशनामध्ये घेतला आहे. तरी या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी, या मागणीचे निवेदन आमदार प्रा.जयंत आसगावकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले. कोल्हापूर दौऱ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार आले असता आमदार आसगावकर यांनी भेट घेवून शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली.
पुणे विभाग शिक्षक आमदार जयंत आसगावकर साहेब यांचा २००५ पूर्वी नियुक्त विनाअनुदानित, अंशतः अनुदानित कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी पेन्शन मिळावी म्हणून पुणे, मुंबई मंत्रालय स्तरावर व महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांच्या भेटीगाठी घेऊन जुनीच पेन्शन मिळावी म्हणून सातत्याने पाठपुरावा करत आहेत.
जुनी पेन्शन योजना लागू करावी, विनाअनुदानित शाळांना टप्पा अनुदान मिळावे, २००५ पूर्वी नियुक्त अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी पेन्शन मिळावी. त्याचबरोबर ३ जानेवारी २०२४ पासून वाढीव टप्पा अनुदान मिळण्यासाठी शिक्षक समन्वय संघाचे मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. याबाबत लवकर तोडगा काढत, पुढील टप्पा अनुदान जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकार यासंदर्भात सकारात्मक असून, अधिवेशनात सरकारने दिलेल्या आश्वासनाचा लवकरच अध्यादेश काढणार असल्याचे सांगितले. यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोर कमिटी व शिक्षण संघर्ष संघटनेचे कार्याध्यक्ष सुदेश जाधव, कोल्हापूर जिल्हा काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, को.जि.मा.शी पतपेढीचे संचालक शिवाजीराव लोंढे, कोल्हापूर जिल्हा क्रीडा संघटनेचे सचिव संदीप पाथरे उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930