नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , वर्ल्ड फॉर नेचरचा सहावा वर्धापनदिन निसर्गमित्र, वन्यजीव रक्षकांच्या उपस्थितीत संपन्न : ‘सर्पदंश मृत्यूमुक्त महाराष्ट्र’ या मुख्य ध्येय उद्देशाची घोषणा – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

वर्ल्ड फॉर नेचरचा सहावा वर्धापनदिन निसर्गमित्र, वन्यजीव रक्षकांच्या उपस्थितीत संपन्न : ‘सर्पदंश मृत्यूमुक्त महाराष्ट्र’ या मुख्य ध्येय उद्देशाची घोषणा

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

वर्ल्ड फॉर नेचरचा सहावा वर्धापनदिन निसर्गमित्र, वन्यजीव रक्षकांच्या उपस्थितीत संपन्न : ‘सर्पदंश मृत्यूमुक्त महाराष्ट्र’ या मुख्य ध्येय उद्देशाची घोषणा

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड
वर्ल्ड फॉर नेचरचा सहावा वर्धापनदिन सर्व निसर्गमित्र, वन्यजीव रक्षकांच्या व वर्ल्ड फॉर नेचरच्या सर्व सदस्य व परिवारासोबत मोठ्या उत्साहात वर्धापनदिन सोहळा पिंपरी चिंचवड (पुणे) येथे पार पडला. वर्ल्ड फॉर नेचर संस्थेतर्फे जीवनगौरव पुरस्कार देऊन डॉ.श्री.सदानंद राऊत व पल्लवी राऊत, श्री. रघुनाथ ढोले यांचा गौरव करण्यात आला. तसेच उत्कृष्ट निसर्गसेवक म्हणून श्री. सुहास कडू यांना गौरवण्यात आले.
यावेळी वर्ल्ड फॉर नेचरच्या वर्षभरातील कार्याचा आढावा घेण्यात आला व वार्षिक अहवालाचे प्रकाशन प्रमुख पाहुणे डॉक्टर श्री. सदानंद राऊत व पल्लवी राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेच्या वतीने ‘सर्पदंश मृत्यूमुक्त महाराष्ट्र’ या मुख्य ध्येयउद्देशाची घोषणा करण्यात आली. यावेळी संस्थेचे श्री श्रेयस पट्टणशेट्टी व तन्वीर सय्यद यांनी या मिशनची सविस्तर संकल्पना सर्वांसमोर मांडली.
यावेळी प्रमुख पाहुणे श्री.सदानंद राऊत यांनी सर्पदंश व उपचार यावर उत्कृष्ट सादरीकरण केले व संस्थेच्या या ध्येयाची भविष्यात असलेली गरज यावर प्रकाश टाकला. आपल्या अनुभवाने त्यांनी आजपर्यँत केलेल्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेतला.
यावेळी निसर्ग संवर्धन, वन्यजीव संवर्धन व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निसर्गमित्रांचा, वन्यजीव रक्षकांचा, सामाजिक कार्य करणाऱ्या सदस्यांचा सन्मान करण्यात आला. वर्ल्ड फॉर नेचर संस्थेतर्फे जीवनगौरव पुरस्कार देऊन डॉक्टर श्री सदानंद राऊत व पल्लवी राऊत, श्री रघुनाथ ढोले यांचा गौरव करण्यात आला. तसेच उत्कृष्ट निसर्गसेवक म्हणून श्री सुहास कडू यांना गौरवण्यात आले. तसेच यावेळी संस्थेच्या विविध जिल्ह्यातील नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
या वर्धापनदिन सोहळ्यास वर्ल्ड फॉर नेचरचे संस्थापक अध्यक्ष श्री.शुभम पांडे, महाराष्ट्र राज्याध्यक्ष श्री.अभिजीत वाघमोडे, उपाध्यक्ष श्री. प्रसाद कुलकर्णी, संस्थेचे सर्व पदाधिकारी, संघटक, सदस्य व या क्षेत्रातील मार्गदर्शक व्यक्ती उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी जपत, समाजभान जपत निसर्गाप्रती, वन्यजीवांप्रती असलेला सेवाभाव म्हणून या आपल्या निसर्गाला जपणे, वन्यजीवांना जपणे व आपल्या जैवविविधतेला अबाधित ठेवणे हेच वर्ल्ड फॉर नेचर संस्थेचे आद्यकर्तव्य आहे व असेल. हा विश्वास अबाधित ठेवत गेल्या सहा वर्षांपासून सुरू असलेला संस्थेच्या या कार्याचा रथ यापुढेही असाच अविरतपणे सुरू ठेवण्याच्या निश्चयाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930