नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भुदरगड तालुक्यात बौद्धविहार उभारण्यासाठी निधी आणू शकलो याचा मोठा आनंद : आमदार प्रकाश आबिटकर – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

भुदरगड तालुक्यात बौद्धविहार उभारण्यासाठी निधी आणू शकलो याचा मोठा आनंद : आमदार प्रकाश आबिटकर

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

भुदरगड तालुक्यात बौद्धविहार उभारण्यासाठी निधी आणू शकलो याचा मोठा आनंद : आमदार प्रकाश आबिटकर

डॉ.आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून पाच कोटीचा निधी

गारगोटी प्रतिनिधी
भुदरगड तालुक्यात येथे सर्वसोयीनियुक्त बौद्धविहार (डॉ.आंबेडकर भवन) उभारण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून पाच कोटीचा निधी आणण्यासाठी केलेला प्रयत्न यशस्वी झाल्याचा मोठा आनंद आहे. या निधीतून समाजाला अभिमान वाटेल अशी वास्तू उभा करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया, असे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले.
भुदरगड तालुक्यासाठी गारगोटी येथे बौद्धविहारासाठी पाच कोटीचा निधी मंजूर केल्याबद्दल तालुक्यातील आंबेडकरी जनतेच्या वतीने आमदार प्रकाश आबिटकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समाज बांधवानी आम.प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते निधीचे पत्र स्वीकारले.
यावेळी बोलताना आम.आबिटकर म्हणाले, तालुक्याचे केंद्र असलेल्या गारगोटी येथे भव्य बौद्धविहार व्हावे असे तालुक्यातील जनतेचे अनेक वर्षाचे स्वप्न आहे. यासाठी भरघोस निधीची मागणी आंबेडकरी जनतेच्या वतीने सातत्याने केली जात होती. अनेक वर्षाचे स्वप्न साकार करण्यासाठी शासन स्तरावर कसोशीने प्रयत्न केले. अनंत अडचणीवर मात करत निधी मिळविण्यात आपण यशस्वी झालो असून यामध्ये मल्टीपर्पज हॉल, ध्यानधारणा, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, निवास व्यवस्था आदी सुविधा करावयाच्या आहेत.
यावेळी आमदार प्रकाश आबिटकर यांचा सत्कार दलितमित्र पी.एस.कांबळे, व्ही.जे.कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भाई आनंदराव आबिटकर यांचा सत्कार जेष्ठ नेते एस.के.कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला. तर माजी सभापती बाबा नांदेकर यांचा सत्कार व्ही.जे.कदम यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी दलितमित्र पी. एस.कांबळे, दशरथ कांबळे, व्ही. जे. कदम यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी जेष्ठ नेते एस.के.कांबळे,
आर. एस. कांबळे, बी. के.कांबळे, श्रीकांत कांबळे, बबन कांबळे, बी.डी. कांबळे, पापालाल कांबळे, प्रा. दयानंद माने, रणजित कांबळे, साताप्पा कांबळे, पी.एन.कांबळे, अनिल कांबळे, सुशांत कांबळे, के. वाय. धम्मरक्षित, जितेंद्र भोसले, एस.डी.कांबळे, एन.जी.कांबळे, ए.बी.कांबळे, परसू कांबळे, अमोल कांबळे, प्रसाद कांबळे, डी. एम.कासारिकर, सुभाष निगडे, संजय कांबळे, गुलाब लांडगे, विजय कांबळे, अमृत कांबळे, शिवाजी कांबळे यांच्यासह समाजबांधब मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी बौद्धविहारच्या जागेबाबतचा इतिहास व निधीबाबत प्राचार्य मिलिंद पांगिरेकर यांनी भूमिका मांडली. आभार व्ही.जे.कदम यांनी तर सूत्रसंचालन नंदकुमार निर्मळे यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930