नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , महिला मुख्याध्यापिका व शिक्षिकांची मतदान केंद्राध्यक्ष तथा सहाय्यक केंद्राध्यक्ष नियुक्ती बदलाची मुख्याध्यापक संघाची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

महिला मुख्याध्यापिका व शिक्षिकांची मतदान केंद्राध्यक्ष तथा सहाय्यक केंद्राध्यक्ष नियुक्ती बदलाची मुख्याध्यापक संघाची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

महिला मुख्याध्यापिका व शिक्षिकांची मतदान केंद्राध्यक्ष तथा सहाय्यक केंद्राध्यक्ष नियुक्ती बदलाची मुख्याध्यापक संघाची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदार संघातील महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका यांना केंद्राध्यक्ष तथा सहाय्यक केंद्राध्यक्ष म्हणून नेमणुका देण्यात आल्या असून सदर नेमणुकामध्ये बदल होऊन त्यांना इतर मतदान अधिकारी म्हणून नेमणूक देण्याचे मागणी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने लेखी निवेदनाद्वारे कोल्हापूर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे केली आहे. मागणीचे निवेदन आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी झालेल्या चर्चेनुसार, ज्या महिला शिक्षिकांना केंद्राध्यक्ष तथा सहाय्यक केंद्राध्यक्ष म्हणून नेमणूक देण्यात आल्या ल आहे अशा महिलांनी आपल्याला आलेल्या ऑर्डरसह मतदान अधिकारी प्रशिक्षणावेळी सदर ऑर्डरमध्ये इतर मतदान अधिकरी म्हणून नेमणूक व्हावी अशा बदल करण्याबाबतचा लेखी विनंती अर्ज नोडल ऑफिसर यांच्याकडे द्यावा असे यावेळी त्यांनी सांगितले. तसेच जे दिव्यांग शिक्षक आहेत त्यांना जर निवडणूक नेमणूक ऑर्डर प्राप्त झाली असेल तर त्यांनी ही ऑर्डरसह विनंती अर्ज व दिव्यांग सर्टिफिकेट द्यावे त्या ऑर्डरमध्ये ही बदल केला जाईल असे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पवार, सचिव आर. वाय.पाटील ,सदस्य एस. के. पाटील, पतपेढीचे संचालक जयसिंग पोवार उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728