नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडा : प्रांतधिकारी श्रीमती वसुंधरा बारवे यांचे निर्देश – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडा : प्रांतधिकारी श्रीमती वसुंधरा बारवे यांचे निर्देश

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडा : प्रांतधिकारी श्रीमती वसुंधरा बारवे यांचे निर्देश
मतदान केंद्राध्यक्ष व अधिकारी यांचे प्रशिक्षण संपन्न

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
लोकसभा निवडणुकीसाठी राधानगरी विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना गणेश भवन, गारगोटी येथे वर्ग प्रशिक्षण व डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुल येथे विशेष हाताळणी प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.
यावेळी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी-१, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी-२ व केंद्रस्तरीय अधिकारी- ३ यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
ईव्हीएम यंत्र हाताळणे, ईव्हीएमची वाहतूक, मतदान केंद्रांची रचना, केंद्रावरील सुरक्षा व्यवस्था, निवडणुकीच्या दिवशी मतदान सुरू होण्यापूर्वी करण्यात येणारे अभिरूप मतदान, मतदानावेळी तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास करावयाच्या उपाययोजनांबाबत प्रशिक्षण देण्यात आले. तसेच मतदानावेळी निवडणूक आयोगांच्या सूचनांबाबतही यावेळी सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना भुदरगड, आजऱ्याच्या प्रांतधिकारी तथा निवडणूक अधिकारी श्रीमती वसुंधरा बारवे यांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडा, असे निर्देश दिले.
यावेळी श्रीमती वसुंधरा बारवे यांनी मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान यंत्र, मतदान केंद्रावर वापरावयाचे
विविध नमुने आदी संदर्भातील माहिती दिली. तसेच निवडणूक आयोगाच्या आवश्यक सूचनांनुसार मतदान प्रक्रिया सुलभ व्हावी या संदर्भातील प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी भुदरगडच्या तहसीलदार सौ. अर्चना पाटील, राधानगरीच्या तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख, अप्पर तहसीलदार विकास बिक्कड, नायब तहसीलदार सुशांत कांबळे आदी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930