नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ‘अध्यात्मातील साहेब’ हे डॉ.श्रीकृष्ण देशमुख यांचे नेमक्या शब्दातील प्रभावी, वस्तुनिष्ठ चरित्र : आदर्श नजरेआड न करण्याचा संदेश देणारे पुस्तक – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

‘अध्यात्मातील साहेब’ हे डॉ.श्रीकृष्ण देशमुख यांचे नेमक्या शब्दातील प्रभावी, वस्तुनिष्ठ चरित्र : आदर्श नजरेआड न करण्याचा संदेश देणारे पुस्तक

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

ज्ञानप्रबोधिनी लाईव्ह विशेष

‘अध्यात्मातील साहेब’ हे डॉ.श्रीकृष्ण देशमुख यांचे नेमक्या शब्दातील प्रभावी, वस्तुनिष्ठ चरित्र : आदर्श नजरेआड न करण्याचा संदेश देणारे पुस्तक
शब्दांकन : प्रा.विनय कुलकर्णी, मुरगूड.

“अध्यात्मातील साहेब” हे ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यांनी लिहिलेले आंतरराष्ट्रीय किर्तीचे व्याख्याते, अध्यात्माचे गाढे उपासक डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख यांचे चरित्र नुकतेच प्रकाशित झाले आहे. या पुस्तकातून डॉ.श्रीकृष्ण द.देशमुख (मुरगूड ता. कागल, जि.कोल्हापूर ) यांच्या एकूण जीवनप्रवासाचा संक्षिप्त पण अत्यंत वस्तुनिष्ठ आलेख वाचकांसमोर मांडण्यात लेखक यशस्वी ठरले आहेत, हे सर्वप्रथम नमूद केले पाहिजे. अगदी सुरुवातीपासून हे छोटेखानी चरित्र वाचकांचे लक्ष वेधून घेते.
लेखक जीवन साळोखे यांनी हे पुस्तक “मुरगुडच्या मातीला आणि माणसांना “आदरपूर्वक अर्पण केलेले आहे.आपल्या मनोगतात ते लिहितात की “डॉक्टरसाहेबांचे हे संक्षिप्त चरित्र आहे. गेली साठ वर्षाहून अधिक काळ मी देशमुख साहेबांचे निरीक्षण करत आलेलो आहे. कधी जवळून तर कधी तटस्थपणे. मी त्यांचा अनुयायी नाही. साधक नाही. तरीही डॉ.देशमुख साहेब यांनी आपल्या एकूण जीवनकार्याने आणि चारित्र्याने एक आदर्श निर्माण केला आहे, जो मुरगुडची अस्मिता आणि प्रतिमा आहे,तो मला नेहमीच भिडत राहिला..!
पुस्तकात जीवन साळोखे यांनी डॉक्टरसाहेबांचे एकूण चरित्र ठळक मुद्द्यांचे आधारे मांडले आहे,…..जसे की त्यांचे शिक्षण, कोल्हापूरच्या सी पी आर हॉस्पिटल मधील सेवा,तेथून मुरगुडच्या जि . प. दवाखान्यात बदली, वैद्यकीय सेवेतील त्यांचा आदर्श, त्यांची बदली, जनरेट्यामुळे त्यांनी दिलेला राजीनामा आणि सुरू केलेली खाजगी प्रॅक्टिस , १२ महिने २४ तास वैद्यकीय सेवा,डॉक्टरांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व,पुढे वैद्यकीय व्यवसायाचा त्याग, वारकरी संप्रदायाचा स्वीकार , शिवगड ची निर्मिती, कौटुंबिक आघात ……असे अनेक प्रसंग त्यांनी ओघवत्या भाषेत, नेमकेपणाने मांडले आहेत.
श्री.साळोखे यांनी डॉक्टरसाहेबांच्या सामाजिक आणि आध्यात्मिक कार्याचा अचूक आढावा घेतला आहे. कोठेही अवास्तव स्तुती, पाल्हाळीक वर्णन, व्यक्तीस्तोम माजवण्याचा प्रयत्न केलेला नाही, हे सर्वात या चरित्राचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. पुस्तकात शेवटी डॉक्टरसाहेबांच्या कर्तृत्वाला समर्पक अशी संत वचने जोडली आहेत.अगदी शेवटी डॉक्टरसाहेबांचा जीवनपट क्रमवार दिला आहे.
सर्वात महत्वाचे या चरित्राचे शीर्षक. “अध्यात्मातील साहेब “. हे शीर्षकच या पुस्तकाचे वेगळेपण दर्शविते. सामान्यतः “साहेब” हा शब्द एखाद्या क्षेत्रातील ज्येष्ठ, अधिकारी व्यक्तीबद्दल आदरपूर्वक वापरला जातो. त्याच भावनेतून हे शीर्षक दिले आहे. “सिध्द पुरूष” या अर्थानेच हा शब्द येथे वापरण्यात आला आहे. डॉक्टर देशमुख यांच्या एकूण व्यक्तिमत्वाची व्याप्ती ही कोणत्याही एका विशिष्ट चौकटीत बंदिस्त करता येत नाही, हेच या शीर्षकातून सुचित केले आहे. लेखकाच्या बालपणापासूनच डॉक्टर देशमुख यांची प्रतिमा ही “साहेब ” अशीच असल्याने आणि त्यांच्या संपूर्ण वर्तन-व्यवहारातून लेखकासमोर तीच अधिक ठळकपणे येत गेल्याने या चरित्राचे शीर्षक यथोचित ठरते,आपले वेगळेपण नोंदवण्यात यशस्वी ठरते. जाणकार वाचकांना त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण करते.
नव्या पिढीला डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख साहेब यांचा परिचय करून देणारे हे पुस्तक छोटेखानी दिसत असले तरी “घागरमें सागर” असे आशयपूर्ण नक्कीच आहे. संतोष कदम यांनी या पुस्तकाचे समर्पक आणि चित्तवेधक मुखपृष्ठ केले आहे.प्रसिद्ध प्रकाशक “अभिनंदन प्रकाशन , कोल्हापूर” यांनी या पुस्तकाची सुबक निर्मिती केली आहे. या पुस्तकासाठी ठळक टाईप वापरल्याने पुस्तक वाचण्यास अधिकच सुलभ ठरते.
एकूणच डॉक्टर देशमुख यांच्याबद्दल सर्वसामान्य वाचकाला जी नेमकी माहिती पाहिजे, ती पाल्हाळीक वर्णन टाळून, नेटकेपणाने देण्यात आणि त्यांच्याबद्दलची कृतज्ञता,आदराची भावना योग्यरित्या मांडण्यात हे छोटेखानी चरित्र यशस्वी ठरले आहे.
सामाजिक भल्यासाठी कोणत्याही क्षेत्रातील आदर्श नजरेआड न करण्याचा संदेश देणारे हे पुस्तक आहे…!

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930