नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शिक्षणाच्या काळात चांगल्या पुस्तकांच्या वाचनाची सवय लावावी : बी.के.गोंडाळ – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

शिक्षणाच्या काळात चांगल्या पुस्तकांच्या वाचनाची सवय लावावी : बी.के.गोंडाळ

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

शिक्षणाच्या काळात चांगल्या पुस्तकांच्या वाचनाची सवय लावावी : बी.के.गोंडाळ

५० शिबिरार्थीना ‘स्वातंत्र्य लढ्यातील वीरांगना’ हे पुस्तक भेट

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, ओणी
आपल्या भविष्यवेधी, उज्ज्वल भवितव्यासाठी, संस्कारक्षम जीवनासाठी, मुलांनी आपल्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या काळात चांगल्या पुस्तकांच्या वाचनाची सवय लावावी असे प्रतिपादन उपक्रमशील शिक्षक श्री.बी.के.गोंडाळ यांनी केले.
ओणी (ता.राजापूर) येथील नूतन विद्यामंदिरमध्ये राष्ट्र सेवा दलाचे दस्तानायक शिबीर सुरु आहे. तेथे सहभागी शिबिरार्थी मुलांना, माझे वाचनवेड या विषयावर बी.के.गोंडाळ यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
या शिबिरात १४७ विद्यार्थी सहभागी आहेत. त्यापैकी ५० विद्यार्थ्यांना कोल्हापूर येथील साहित्यिक रमेश वारके यांचे ‘स्वातंत्र्य लढ्यातील वीरांगना’ हे पुस्तक भेट दिली
तसेच त्यांनी आपल्या माध्यमिक विद्यालयामध्ये घेत असलेल्या पुस्तक परीक्षण, वाचनवीर पुरस्कार, हस्ताक्षर सुधार उपक्रम, रद्दीतून ग्रंथालय, प्रत्येक वर्गातील ग्रंथालय, वृत्तपत्र वाचन कट्टा, डायरी आदी उपक्रमाची माहिती दिली व त्या उपक्रमांच्या वह्यांचे प्रदर्शन मांडले होते त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला.
यावेळी वात्सल्य मंदिराचे माजी अध्यक्ष देवेंद्र गुजर, राष्ट्रीय प्रशिक्षक बाबासाहेब नदाफ, सचिव रुपेश गीता रामचंद्र, प्रतिभा गुजर, अधिक्षिका सुवर्णा राघव, माजी सचिव नाना मुजुमदार, मालती गोंडाळ, मुख्याध्यापक तानाजी शिंदे उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031