अक्षरमित्र दीपक सुतार यांच्या ‘सुंदर हस्ताक्षर’ उपक्रमाचे आमदार प्रकाश आबिटकर यांचेकडून कौतुक
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
अक्षरमित्र दीपक सुतार यांच्या ‘सुंदर हस्ताक्षर’ उपक्रमाचे आमदार प्रकाश आबिटकर यांचेकडून कौतुक

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
बळीराजा इंटरनॅशनल स्कूल, गंगापूर (ता. भुदरगड) येथे आयोजित केलेल्या समर कॅम्पचा सांगता समारंभ आमदार प्रकाशराव आबिटकर यांचे उपस्थितीत पार पडला. समर कॅम्प मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून २५० हून अधिक मुलांनी सहभाग नोंदविला.
या कॅम्प मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यापैकी ‘सुंदर हस्ताक्षर’ या उपक्रमाचे आमदार प्रकाश आबिटकर यांचेकडून विशेष कौतूक झाले. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते अक्षरमित्र दीपक सुतार यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री.अजित जाधव-पाटील, शिक्षक स्टाफ , मान्यवर व पालक उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





