नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आंबवणे येथील मातंग समाजाच्या मुलीने प्रतिकुल परिस्थितीवर मात करत मिळवले उत्तुंग यश – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

आंबवणे येथील मातंग समाजाच्या मुलीने प्रतिकुल परिस्थितीवर मात करत मिळवले उत्तुंग यश

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

आंबवणे येथील मातंग समाजाच्या मुलीने प्रतिकुल परिस्थितीवर मात करत मिळवले उत्तुंग यश

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
आंबवणे (ता. भुदरगड) येथील गरीब, कष्टाळू, शेतकरी कुटुंबातील मातंग समाजातील मुलीने खासगी शिकवणी शिवाय घरी अभ्यास करून अनेक अडचणीचा सामना करत दहावीत ९१.६० टक्के गुण मिळवले. प्रणाली धनाजी मोरे असे तिचे नाव आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशस्वी झालेल्या प्रणिताचे सर्वत्र कौतुक होत आहे. ती खानापूर येथील राजमाता गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी आहे.
प्रणालीचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. मनात जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे प्रणिताने आपल्या कष्टातून दाखवून दिले. प्रणालीने यापूर्वी इयत्ता आठवी मध्ये एन एम एम एस परीक्षेत अनुसूचित जातीमधून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.
आई-वडील मोलमजुरी करत सोबत आपला पारंपारिक व्यवसाय झाडू बांधण्याचे कामही करतात. घरची आर्थिक परिस्थिती बेताची हे चित्र डोळ्यासमोर ठेवून तब्बल सहा ते आठ तास अभ्यास करून तिने हे यश संपादन केले. भविष्यात अधिकारी होऊनच आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करण्याचा तिचा मनोदय आहे. तिला आई सुमन वडील धनाजी व शिक्षक यांचे प्रोत्साहन लाभले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031