नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भुदरगड केमिस्ट असोसिएशनकडून जागतिक पर्यावरणदिनी वृक्षारोपण – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

भुदरगड केमिस्ट असोसिएशनकडून जागतिक पर्यावरणदिनी वृक्षारोपण

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

भुदरगड केमिस्ट असोसिएशनकडून जागतिक पर्यावरणदिनी वृक्षारोपण

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
पर्यावरणाचा ढासळता समतोल अबाधित रहावा, पृथ्वी सर्वांग सुंदर व्हावी यासाठी लोकसहभागातून झाडे लावण्याबरोबरच त्यांचे जतन व संवर्धन होणे काळाची गरज आहे. आज घडीस असह्य होणारी तापमानवाढ पाहता पर्यावरणात महत्वाच्या स्थानी असणाऱ्या झाडांचे महत्व ओळखून जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधत भुदरगड तालुक्यातील तळेमाऊली जंगल परिसरात रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपणाबरोबरच विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आले.
2020 साली पुनर्रोपण केलेल्या झाडाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वड, जांभूळ, आवळा, कैलासपती, आपटा, हेळा, कडुनिंब ह्या देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले त्याचबरोबर करंज, बहावा, चिंच, हिरडा, बेहडा, मोह, गारदळ, एरंड, शिसम, जांभूळ, आंबा, अर्जुन, पळस, पांगारा, काटेसावर, नाना, कलम, तोरणं, करवंद, कुंभा, गेळवन, रतनगुंज इत्यादी झाडांच्या बियांचे संकलनही करण्यात आले.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य सादत उपक्रम राबविताना झाडाचा वाढदिवस, बीजसंकलन, वृक्षारोपण याबरोबरच पर्यावरणमित्र अवधुत पाटील यांच्याकडून देशी वृक्षांच्या बियांची माहितीही देण्यात आली. शिवाय झाडांच्या जतन व संवर्धनासाठी कोणत्या उपाय योजना कराव्यात याचे अनुमान बांधण्यात आले व केमिस्ट असोशिएशनतर्फे भुदरगड तालुक्यात वृक्षारोपणाची चळवळ गतिमान करण्याचा संकल्प करण्यात आला. सदर पर्यावरणपूरक उपक्रमात महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशनचे संचालक शिवाजीराव ढेंगे, तालुका अध्यक्ष प्रशांत माळी, बार असोसिएशनचे अडव्होकेट संग्रामसिंह कडव, सामाजिक वनीकरणच्या प्रियांका येरुडकर, वनविभागचे बळवंत शिंदे, आशिष चाळसकर, प्रसिध्द वक्ते युवराज पाटील, केमिस्टचे संचालक गजानन मिटके, सुरेश पाठक, रमेश कारेकर, बाबासाहेब मोरस्कर, दिपक गोंजारी, विनोद देसाई, श्रीकृष्ण लोकरे, सुनील खाडे, शिशिर पाटील कडगाव, सुधीर शिंत्रे, सदाशिव सुतार मुरुकटे आदींनी सहभाग घेतला.
सदर उपक्रमाचे आयोजन पर्यावरणमित्र अवधुत पाटील व कुटुंबीयांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728