नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांना राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांना राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांना राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर

ज्ञानप्रबोनिधी प्रतिनिधी, कोल्हापूर
यावर्षीचा राजर्षी शाहू पुरस्कार ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांना जाहीर झाला असून २६ जून २०२४ रोजी राजर्षी शाहू जयंती दिनाचे औचित्य साधून पुरस्कारा वितरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी व ट्रस्टचे अध्यक्ष अमोल येडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे राजर्षी शाहू पुरस्कार दिला जातो. मानाचा ३८ वा राजर्षी शाहू पुरस्कार ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांना जाहीर झाला आहे. मानचिन्ह, मानपत्र व एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे. श्री.शाहू स्मारक भवन येथे बुधवार दि.२६ जून २०२४ रोजी समारंभपूर्वक पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.
राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे १९८४ पासून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. दरम्यान ट्रस्टतर्फे शाहू जयंतीचे औचित्य साधून २१ ते २५ जून २०२४ या कालावधीत व्याख्यानमाला आयोजित केली आहे. शाहू स्मारक भवन येथे व्याख्यानमाला आणि पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. व्याख्यानमालेतंर्गत २१ जून रोजी ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांचे ‘भारतातील संसदीय लोकशाही’ या विषयावर व्याख्यान आहे. २२ जून रोजी डॉ शिवाजी पाटील (सातारा) यांचे ‘भारतातील न्यायव्यवस्था’ या विषयावर व्याख्यान आहे. २३ जून रोजी सातारा येथील किशोर बेडकीहाळ यांचे ‘भारतीय राष्ट्रवाद-वाटा आणि वळणे’ या विषयावर तर २४ जून रोजी मुंबई येथील डॉ. उत्तरा सहस्त्रबुद्धे यांचे ‘भारताचे परराष्ट्र धोरण’ या विषयावर व्याख्यान आहे.
दि.२५ जून रोजी, निवृत्त जिल्हाधिकारी व साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांचे ‘राजर्षी शाहू महाराज व भारताचे संविधान’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. व्याख्यानमाला रोज सायंकाळी सहा वाजता सुरू होईल. जिल्हा प्रशासन, राजर्षी शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. पत्रकार परिषदेला डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. अशोक चौसाळकर उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031