नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नाबाबत २७ जूनपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठविणार : आमदार सतेज पाटील – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नाबाबत २७ जूनपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठविणार : आमदार सतेज पाटील

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नाबाबत २७ जूनपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठविणार : आमदार सतेज पाटील

खंडेराव जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक दिनदर्शिकेचे प्रकाशन

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांच्या ५२ व्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. या दिनदर्शिकेचे प्रकाशन माजी मंत्री, आमदार सतेज पाटील आणि आमदार जयंत आसगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. वि‌द्याभवन, कोल्हापूर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
प्रारंभी आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते खंडेराव जगदाळे यांना श्री अंबाबाईची प्रतिमा आणि शाल देऊन त्यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला. यावेळी आमदार सतेज पाटील म्हणाले, आपल्या देशामधील प्रत्येक राज्यातील शैक्षणिक धोरण है वेगवेगळ्या पद्धतीचे असून, याबाबत अभ्यास करणे गरजेचे आहे. शिक्षकांसाठीचे टप्पा वाढ, संच मान्यता अशा विविध प्रलंबित प्रश्नाबाबत येत्या २७ जूनपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठवून त्यावर योग्य त्या उपाययोजना केल्या जातील.
आमदार जयंत आसगावकर म्हणाले, मी निवडून आल्यानंतर शिक्षणातील अनेक प्रश्न मार्गी लावले. प्रलंबित इतर प्रश्न सोडविण्यासाठी मी कटीबद्ध असून त्यात कोठेही कमी पडणार नाही. शिवाजी कुरणे यांनी खंडेराव जगदाळे यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे, दादा लाड, आर. वाय. पाटील, अनिल घाटगे, रवींद्र मोरे यांनी मनोगत व्यक्त केली.
यावेळी बी. जी. काटे, बी. जी. बोराडे, एस. डी. लाड, विलास साठे, के. बी. पोवार, सविता पाटील, राहुल पोवार, बाबा पाटील, सुरेश संकपाळ, मिलिंद पांगीरेकर, के. के. पाटील, उदय पाटील, दत्ता पाटील, रविंद्र मोरे, सागर चुडाप्पा, श्रीकांत कदम, डी. पी. कदम, एन. आर. भोसले, दीपक पाटील, बाळ डेळेकर, सुभाष खामकर, हेमंत धनवडे, अमोल पाटील, राजशेखर म्हमाने, संग्राम कांबळे, यांच्यासह शिक्षक मोठ्‌या संख्येने उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930