नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , नवीन संच मान्यता आदेश रद्द करा : आमदार जयंत आसगावकर यांची शिक्षणमंत्री नाम.केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

नवीन संच मान्यता आदेश रद्द करा : आमदार जयंत आसगावकर यांची शिक्षणमंत्री नाम.केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

नवीन संच मान्यता आदेश रद्द करा : आमदार जयंत आसगावकर यांची शिक्षणमंत्री नाम.केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, मुंबई
शासनाने १५ मार्च २०२४ रोजी काढलेला संच मान्यता आदेश तात्काळ रद्द करावा, अशी मागणी आमदार जयंत आसगावकर यांनी निवेदनाद्वारे शालेय शिक्षणमंत्री नामदार दीपक केसरकर यांच्याकडे केली. हा आदेश रद्द करण्यासाठी शिक्षण आयुक्त यांच्याकडे अभिप्राय मागविला असून लवकरच त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.
आमदार जयंत आसगावकर यांनी आज अधिवेशन काळात मंत्री नाम केसरकर यांची भेट घेऊन याप्रश्नी सखोल चर्चा केली. यावेळी बोलताना आमदार जयंत आसगावकर म्हणाले, हा नवीन आदेश बऱ्याच शाळांना मारक ठरणारा आहे. या आदेशामुळे मुख्याध्यापक पद तसेच शाळेतील शिक्षकांची पदे कमी होणार असून याचा मराठी माध्यमांच्या शाळांना मोठा फटका बसणार आहे. या आदेशामुळे विद्यार्थी संख्या कमी होणार असून बहुजन समाजातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणार नाही. तरी हा आदेश रद्द करून पूर्वी प्रमाणे संच मान्यता करावी.
मंत्री केसरकर म्हणाले, हा आदेश रद्द करण्यासाठी शिक्षण आयुक्त यांच्याकडे अभिप्राय मागविला असून लवकरच त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930