नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , वर्ल्ड फॉर नेचर आणि वाय. सी. एम. हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘लाईफ अफ्टर बाईट’ हा कार्यक्रम संपन्न : सर्पदंशाविषयी अनुभव व मार्गदर्शन यावर आदान प्रदान – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

वर्ल्ड फॉर नेचर आणि वाय. सी. एम. हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘लाईफ अफ्टर बाईट’ हा कार्यक्रम संपन्न : सर्पदंशाविषयी अनुभव व मार्गदर्शन यावर आदान प्रदान

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

वर्ल्ड फॉर नेचर आणि वाय. सी. एम. हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘लाईफ अफ्टर बाईट’ हा कार्यक्रम संपन्न : सर्पदंशाविषयी अनुभव व मार्गदर्शन यावर आदान प्रदान

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड
वर्ल्ड फॉर नेचर आणि वाय. सी. एम. हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने “लाईफ अफ्टर बाईट” या कार्यक्रमातून सर्पमित्र, डॉक्टर यांच्या सर्पदंशाविषयी अनुभव व मार्गदर्शन यावर आदान-प्रदान बैठक आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमात वाय सी एम चे अनुभवी डॉक्टर व स्टाफ आणि महाराष्ट्रातील सर्पमित्र यांचे प्रशिक्षण “डॉ. सदानंद राऊत” यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. डॉ. सदानंद राऊत (वर्ल्ड हेल्थ ऑरगॅनिझशन च्या सल्लागार समिती सदस्य, संस्थापक विघ्नहर हॉस्पिटल नारायणगाव, सर्पदंश विशेषज्ञ) यांना सर्पदंश विषयात ३५ वर्षाचा अनुभव आहे.आजवर त्यांनी १२,००० पेक्षा जास्त रुग्णांना जीवनदान दिले आहे. त्यांनी जगभरातील २०,००० पेक्षा जास्त डॉक्टरांचे प्रशिक्षण घेतले असून देशभरात ५०० पेक्षा जास्त याविषयक प्रबोधनपर व्याख्यान दिली आहेत.
सर्पदंश झाल्यानंतर कोणत्या सापाच्या दंशामुळे काय कोणती लक्षणे दिसून येतात तसेच त्यावेळी डॉक्टरांनी काय केले पाहिजे, सर्पदंश झाल्यावर प्रतिविषविरोधी लस किती प्रमाणावर दिली पाहिजे आणि गंभीर परिस्थिती मध्ये रुग्णाची स्थिती काय असते व त्यावेळी कसे उपचार केले पाहिजेत याची माहिती डॉ. राऊत यांनी सविस्तर समजावून सांगितली. वाय. सी.एम. चे वैद्यकीय अधिकारी डॉ. विनायक पाटील यांनी त्यांच्या १५ वर्षाच्या कार्यकाळात काय अनुभव आले आणि निरनिराळ्या परिस्थितीतून रुग्णांना कसे जीवनदान दिले याची माहिती दिली.
वर्ल्ड फॉर नेचर चे संस्थापक अध्यक्ष शुभम पांडे यांनी सापांची ओळख व आपल्या परिसरात आढळणारे विषारी साप यांची माहिती त्यांच्या व्याख्यानात दिली. तसेच सर्पमित्र व डॉक्टर यांनी नेहमी ज्ञानार्जन करीत राहावे व आपल्या क्षेत्रात अष्टपैलू होऊन आपापल्या कार्यात भरीव योगदान द्यावे असा संदेश त्यांनी दिला.
या कार्यक्रमात वाय.सी.एम. चे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे तसेच पुणे, संगमनेर, ठाणे, अकोला, नगर, दौड, शिरूर, औरंगाबाद, यवतमाळ, चंद्रपूर, धुळे, सिल्लोड, नंदुरबार, जळगाव या जिल्यातील वन्यजीव संस्था व वन्यजीव संरक्षकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमात सहभागी सर्वांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देण्यात आले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930