नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , प्राचार्य जीवन साळोखे ग्रंथदान उपक्रमांतर्गत हातकणंगले तालुक्यातील २५ हायस्कूल्स व ज्युनिअर कॉलेजना ग्रंथदान करणार : माजी खासदार निवेदिता माने यांच्या हस्ते ११ जुलै रोजी ग्रंथदान सोहळ्याचे आयोजन – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

प्राचार्य जीवन साळोखे ग्रंथदान उपक्रमांतर्गत हातकणंगले तालुक्यातील २५ हायस्कूल्स व ज्युनिअर कॉलेजना ग्रंथदान करणार : माजी खासदार निवेदिता माने यांच्या हस्ते ११ जुलै रोजी ग्रंथदान सोहळ्याचे आयोजन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

प्राचार्य जीवन साळोखे ग्रंथदान उपक्रमांतर्गत हातकणंगले तालुक्यातील २५ हायस्कूल्स व ज्युनिअर कॉलेजना ग्रंथदान करणार : माजी खासदार निवेदिता माने यांच्या हस्ते ११ जुलै रोजी ग्रंथदान सोहळ्याचे आयोजन

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, हातकणंगले
हातकणंगले तालुक्यातील २५ हायस्कूल्स व ज्युनिअर कॉलेजना शालेय ग्रंथालय समृद्धीसाठी आपल्या ग्रंथदान उपक्रमांतर्गत ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य जीवन साळोखे यांचेकडून पाचशेहून अधिक दर्जेदार पुस्तके भेट देण्यात येणार आहेत. गुरुवार दि.११ रोजी ज्येष्ठ नेत्या, माजी खासदार निवेदिता माने यांच्या शुभहस्ते हा ग्रंथदान सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी प्राचार्य जीवन साळोखे, प्राचार्य प्रशांतकुमार कांबळे, डाॅ. विलास पाटील, डाॅ. आरती भोसले यांची प्रमुख उपस्थिती आहे.
हा ग्रंथदान कार्यक्रम बाळासाहेब माने शिक्षण संकुलातील राजभवन सभागृहात दि. ११ जुलै रोजी सकाळी ठीक ११.०० वा. होणार आहे. हातकणंगले तालुक्यात अशाप्रकारे प्रथमच ग्रंथदान उपक्रमांतर्गत कार्यक्रम होत आहे.
या कार्यक्रमास सर्व संबंधितांनी अगत्याने उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन कार्यक्रमाच्या निमंत्रक, काकासाहेब माने हायस्कूल, रुकडीच्या मुख्याध्यापिका सौ. पद्मजा पाटील यांनी केले आहे.
ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यांचा ग्रंथदान उपक्रम गेली अठरा वर्षे सतत सुरू असून बारा हजारांहून अधिक दर्जेदार पुस्तके जिल्ह्यातील शेकडो शाळांना आजपर्यंत ग्रंथभेट म्हणून दिली आहेत.
हातकणंगले तालुक्यातील समाविष्ट शाळांची नावे अशी : जयवंत माध्यमिक विद्यालय, मजले, बाळासाहेब पाटील (दादा) हायस्कूल, आळते, न्यू. इंग्लिश स्कूल,चंदूर, आण्णासाहेब राजमाने विद्यालय,रूई, साजणी हायस्कूल,साजणी, शिवनेरी विद्यालय,तिळवणी, ए.पी.मगदूम हायस्कूल माणगाव, रामराव इंगवले हायस्कूल, हातकणंगले, माध्यमिक विद्यालय, हातकणंगले, माध्य.आश्रमशाळा, हातकणंगले, महात्मा गांधी विद्यालय, रूकडी, अचिव्हर्स हायस्कूल, अतिग्रे, पायोनियर हायस्कूल, अतिग्रे, सह्याद्री विद्यानिकेतन माले, हेरले हायस्कूल, हेरले

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930