नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , नवीन संच मान्यता आदेश रद्द करण्यासाठी शासनास सकारात्मक अहवाल देणार : शिक्षण आयुक्त मांढरे यांची माहिती – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

नवीन संच मान्यता आदेश रद्द करण्यासाठी शासनास सकारात्मक अहवाल देणार : शिक्षण आयुक्त मांढरे यांची माहिती

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

नवीन संच मान्यता आदेश रद्द करण्यासाठी शासनास सकारात्मक अहवाल देणार : शिक्षण आयुक्त मांढरे यांची माहिती

आ.जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, पुणे
१५ मार्च २०२४ चा संच मान्यता आदेश रद्द करण्यासाठी आपण शासनास सकारात्मक अहवाल देणार असल्याची माहिती पुणे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी आमदार जयंत आसगावकर यांना दिली. आमदार जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखालील पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर येथील मुख्याध्यापकांच्या शिष्टमंडळाने आज मांढरे यांची भेट घेऊन याप्रश्नी चर्चा करत पत्र दिले.
यावेळी बोलताना आमदार जयंत आसगावकर म्हणाले, शासनाने १५ मार्च २०२४ रोजी काढलेला संच मान्यता आदेश हा बऱ्याच शाळेना मारक ठरणारा आहे. या आदेशामुळे मुख्याध्यापक पद तसेच शाळेतील शिक्षकांची पदे कमी होणार असून याचा मराठी माध्यमांच्या शाळांना मोठा फटका बसणार आहे. या आदेशामुळे विद्यार्थी संख्या कमी होणार असून बहुजन समाजातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणार नाही. या प्रश्नी आपण पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडलेली आहे. शालेय शिक्षणमंत्री यांनी या सूचनांची देखील दखल घेत आपणाकडून अहवाल मागविलेला आहे.
याबाबत आपण माहिती घेऊन शासनास परिपूर्ण असा सकारात्मक अहवाल सादर करणार असल्याचे मांढरे यांनी सांगितले. यावेळी कोल्हापूर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पोवार, खाजगी प्राथमिक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे, सातारा मुख्याध्यापक संघाचे सचिव श्री.येवले व उपाध्यक्ष श्री.कोंडे, मुख्याध्यापक संघाचे माजी सचिव दत्ता पाटील, शिक्षक नेते आण्णासाहेब गायकवाड, एम. आर. पाटील, संतोष आयरे, सी.एम.गायकवाड आदी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930