नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शिवगंधार प्रस्तुत ‘धारा अभंगाच्या’ या श्रवणीय कार्यक्रमास रसिक श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : तब्बल अडीच तासाहून अधिक काळ श्रोते मंत्रमुग्ध – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

शिवगंधार प्रस्तुत ‘धारा अभंगाच्या’ या श्रवणीय कार्यक्रमास रसिक श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : तब्बल अडीच तासाहून अधिक काळ श्रोते मंत्रमुग्ध

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

शिवगंधार प्रस्तुत ‘धारा अभंगाच्या’ या श्रवणीय कार्यक्रमास रसिक श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : तब्बल अडीच तासाहून अधिक काळ श्रोते मंत्रमुग्ध

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
शिवगंधार मराठी वाद्यवृंद कोल्हापूर यांच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त श्री. शाहू वाचनालय, गारगोटी येथे भक्ती गीतांचा ‘धारा अभंगाच्या’ हा श्रवणीय कार्यक्रम संपन्न झाला. यां कार्यक्रमात संगीतकार शिवराज पाटील, डॉ. पूजा नरेंद्र पाटील, कु.कैवल्य पाटील, कु. स्वरा पाटील यांनी गायिलेल्या अभंग रचनेला उपस्थित रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. या भक्ती गीतांच्या श्रवणीय कार्यक्रमात तब्बल अडीच तासाहून अधिक काळ श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संगीतकार शिवराज पाटील यांनी ‘जय जय राम कृष्ण हरी या अभंगवाणीने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर गुरुपौर्णिमेनिमित्त ‘गुरु परमात्मा परेशु’ ही अभंग रचना सादर केली.
श्री.शिवराज पाटील आणि कु. कैवल्य पाटील यांनी गायिलेल्या ‘कानडा राजा पंढरीचा’ या अभंगाला वन्स मोअर मिळाला. या दोघांनी ‘कीर्तनाचा गजर होतं’, ‘आम्हा न कळे ज्ञान’ हे अभंग गायीले.
डॉ.पूजा नरेंद्र पाटील यांनी किशोरी अमोनकर यांनी स्वरबद्ध केलेल्या चालीमध्ये ‘बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल’ हा अभंग गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी ‘पद्मनाभा नारायणा’ व ‘वेढा वेढा रे पंढरी’ हे अभंग गायिले.
कु. कैवल्य शिवराज पाटील याने पंडित जितेंद्र अभिशेकी यांनी स्वरबद्ध केलेली रचना ‘सुखाचेही सुख चंद्रभागे तटी’ आणि ‘संतांचेही गावी प्रेमाचा सुकाळ’ हे गायीली. तसेच ‘येवो विठ्ठले भक्त जण बसले’ हा अभंग गायीला. कु.स्वरा नरेंद्र पाटील हिने ‘विठाई विठाई माझे कृष्णाई, कान्हा येई हो…’ हा अभंग गायीला.
‘संतभार पंढरीत कीर्तनाचा गजर होतं’ या संतपदाने कार्यक्रमाची सांगता झाली. ‘धारा अभंगाच्या’ या भक्ती गीतांच्या श्रवणीय कार्यक्रमात संगीत साथ तबला विशारद नरेंद्र पाटील, तबला वादक रोहित तांबेकर, हर्ष जांभळे यांनी दिली. तर कार्यक्रमाचे निवेदन, नवोदित प्रवचनकार श्री.एस.के.पाटील यांनी केले. श्री.एस.के.पाटील यांच्या समयसूचक निवेदनाने कार्यक्रमात रंगत आली. गायक व कलाकारांची ओळख व उपस्थितांचे आभार संयोजक, मंजुनाथ ग्रामीण विकास संस्थेचे संस्थापक नाथाजीराव पाटील यांनी मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728