नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , अवकाशातील ताऱ्यास मिळाले अण्णाभाऊ साठेंचे नाव : छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजक सुशील तुपे यांच्या अथक प्रयत्नाना यश – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

अवकाशातील ताऱ्यास मिळाले अण्णाभाऊ साठेंचे नाव : छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजक सुशील तुपे यांच्या अथक प्रयत्नाना यश

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

अवकाशातील ताऱ्यास मिळाले अण्णाभाऊ साठेंचे नाव : छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजक सुशील तुपे यांच्या अथक प्रयत्नाना यश

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य किती महान होते याची माहिती जगासमोर यावी उद्देशाने छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजक सुशील तुपे यांच्या अथक प्रयत्नानंतर अवकाशातील ताऱ्याला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव मिळाले असून येत्या १ ऑगस्ट रोजी अण्णाभाऊंच्या १०४ व्या जयंतीदिनी रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र अर्पण करण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजक सुशील तुपे यांनी या ताऱ्याचे रजिस्ट्रेशन केले आहे. मागील सहा महिन्यांपासून ते यासाठी अथक प्रयत्न घेत होते. त्यांनी इंटरनॅशनल स्टार अँड स्पेस रजिस्ट्री या संस्थेकडे सर्व कागदपत्रांची माहिती पुरवली. त्यानंतर महिनाभरापूर्वी ताऱ्याचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाले. संपूर्ण जगाला माहिती व्हावी की, अण्णाभाऊ साठे कोण होते, त्यांचे कार्य किती महान होते, या उद्देशाने ताऱ्याचे रजिस्ट्रेशन करण्यात आले, असे त्यांनी सांगितले.
१ ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी अण्णाभाऊंच्या जन्मगावी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे जाऊन त्यांचे चिरंजीव सचिन साठे व सून सावित्रीबाई यांना रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर विविध ठिकाणी जाऊन समाजबांधवांना हे प्रमाणपत्र दाखवून अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले जाईल, असे सुशील तुपे यांनी सांगितले.
१ ऑगस्ट रोजी हा तारा प्रत्येकाला बघता येणार आहे. यासाठी मोबाइल प्ले स्टोअरमध्ये जाऊन स्पेस रजिस्ट्री किंवा स्टार नेमिंग ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्या ॲप्लिकेशनमध्ये रजिस्ट्री ताऱ्याचा नंबर WVP773557 टाकून तुम्ही तो बघू शकता. तसेच ‘द इनोव्हेटिव्ह युजर स्टार फाइंडर थ्रीडी स्मार्टफोन ॲप अँड्रॉइड अँड आयओएस वरून देखील हा तारा बघता येईल, अशी माहिती सुशील तुपे यांनी दिली. या निमित्ताने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती अनोख्या पद्धतीने साजरी केली जाणार आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031