नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , थाळी नादाचा आक्रोश शासनापर्यंत पोहचवणार : आमदार जयंत आसगावकर – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

थाळी नादाचा आक्रोश शासनापर्यंत पोहचवणार : आमदार जयंत आसगावकर

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

थाळी नादाचा आक्रोश शासनापर्यंत पोहचवणार : आमदार जयंत आसगावकर

कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
सरकारने विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना वाढीव टप्पा देण्याची घोषणा विधानसभेत केली असताना सुद्धा प्रशासकीय विभागाकडून वाढीव टप्प्याचा जीआर निघत नसल्याने विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांनी शुक्रवारी भर पावसात प्रशासनाच्या विरोधात थाळीनाद आंदोलन केले.
विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने वाढीव टप्प्याचा जीआर लवकर निघावा, १५ मार्चच्या संचमान्यतेचा जीआर रद्द करावा, आदी मागण्यासाठी येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर १ ऑगस्टपासून आंदोलने सुरू आहे. या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी शिक्षकांच्या वतीने थाळीनात आंदोलन करण्यात आले.
यावेळी कायम विनानुदानित शाळा कृती समितीचे खंडेराव जगदाळे यांनी प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करून प्रशासनाने तात्काळ जीआर न काढल्यास बुखरू स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी श्री.जगदाळे यांनी दिला.
यावेळी आमदार जयंत आसगावकर यांनी मुंबईमध्ये गेल्या तीन दिवसांपासून टप्पा वाढीबाबत जो प्रयत्न केला त्याचा सविस्तर वृतांत सांगितला. जोपर्यंत प्रश्न मिटत नाही तोपर्यंत मी कृती समितीबरोबर असणार आहे, तसेच आपल्या थाळी नादाचा आक्रोश शासनापर्यत पोहचवणार व न्याय मिळवून देणार असे स्पष्ट केले
यावेळी शिक्षण उपसंचालक श्री.महेश चोथे उपस्थित होते.
यावेळी मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पोवार, सचिव आर.वाय.पाटील, सहसचिव श्रीकांत पाटील, महामंडळाचे उपाध्यक्ष डी.एस.घुगरे, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचेउपाध्यक्ष एम.एन.पाटील कृती समितीचे बाबा पाटील, माजी सचिव दत्ता पाटील, दीपक पाटील, डी पी कदम, मनोहर पवार, अशोक हुबळे, एम.आर.पाटील, मनोहर जाधव या सर्वानी आंदोलनास पाठिंबा दिला. यावेळी शाहीर राजू भोरे, धनाजी बेलेकर, शिवाजी कुरणे, अमर पाटील, केदारी मगदूम, भाग्यश्री राणे, एम एन पाटील,सचिन कांबळे, हेमंत अडसूळे, सावंता माळी, माधुरी भवरे, गौतमी पाटील, मदने यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031