नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , गारगोटीत संत शिरोमणी नामदेव महाराज समाधी सोहळा संपन्न – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

गारगोटीत संत शिरोमणी नामदेव महाराज समाधी सोहळा संपन्न

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

गारगोटीत संत शिरोमणी नामदेव महाराज समाधी सोहळा संपन्न

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
गारगोटीत संत शिरोमणी नामदेव महाराजांचा समाधी सोहळा उत्साहात संपन्न झाला. सकाळी श्री.विठ्ठल मंदिरात सौ व श्री प्रताप पतगे या उभयांतांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. तसेच ह. भ. प. भालेकर महाराज (भालेकरवाडी) यांच्या भजन व कीर्तनाचा कार्यक्रम झाला. दुपारी नामदेवांच्या प्रतिमेस फुले वाहण्यात आली. यानंतर इयत्ता 10 वी व 12 वी व शैक्षणिक क्षेत्रात विशेष गुण प्राप्त केलेल्या अद्वैत ज्ञानेश्वर मिरजकर, कु. श्रावणी गजानन वर्णे, चिन्मय प्रसाद वर्णे, पार्थ नारायण हावळ, केदार स्वप्नील उरुणकर, वल्लभ सचिन उरुणकर, आराध्या हावळ, कु सौम्या संदीप काकडे, मधुरा रामचंद्र मिरजकर तसेच गारगोटी ग्रामपंचायत सदस्यपदी सौ.स्मिता सचिन पिसे यांची निवड झालेबद्दल समाजाच्या वतीने सत्कार करणेत आला.
यानंतर नामदेव महाराजांच्या पालखीची संवाद्य मिरवणूक गारगोटी शहरातून काढण्यात आली. नंतर महाप्रसाद वाटप होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी समाजाचे अध्यक्ष श्री.सुरेश मिरजकर व उपाध्यक्ष श्री.दत्त्तात्रय उरुणकर व सदस्य सर्व बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728