नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राज्याच्या शासनमान्य ग्रंथ यादीत जीवन साळोखे यांचे ‘बुक नव्हे बुके, नॉनस्टॉप हसा..!’ समाविष्ट – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

राज्याच्या शासनमान्य ग्रंथ यादीत जीवन साळोखे यांचे ‘बुक नव्हे बुके, नॉनस्टॉप हसा..!’ समाविष्ट

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

राज्याच्या शासनमान्य ग्रंथ यादीत जीवन साळोखे यांचे ‘बुक नव्हे बुके, नॉनस्टॉप हसा..!’ समाविष्ट

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
दक्षिण महाराष्ट्रातील प्रसिद्ध अभिनंदन प्रकाशन,कोल्हापूर यांनी प्रकाशित केलेले प्राचार्य जीवन साळोखे यांचे ‘बुक नव्हे बुके, नॉनस्टॉप हसा..!’ या विनोदी पुस्तकाचा शासनाच्या ग्रंथ शिफारस यादीत समावेश झाला आहे. शासनाने नुकतीच २०२१ आणि २०२२ या दोन वर्षातील ग्रंथनिवड समितीने निवडलेल्या विविध साहित्य प्रकारातील पुस्तकांची यादी प्रसिद्ध केली आहे.
सन २०२१ मध्ये प्रकाशित होऊन शासनाकडे आलेल्या २७५१ पुस्तकांतून ८८६, तर २०२२ मध्ये शासनाकडे आलेल्या २३९८ पुस्तकांतून ४६२ पुस्तकांचा या ग्रंथ निवड समितीच्या यादीत समावेश केला आहे.
जीवन साळोखे यांचे ‘बुक नव्हे बुके, नॉनस्टॉप हसा..!’ हे पुस्तक २०२१ मध्ये अभिनंदन प्रकाशन, कोल्हापूर यांनी प्रकाशित केले असून त्याचा शासनमान्य यादीतील क्रमांक १६०३ आहे.
यापूर्वी जीवन साळोखे यांचे एक काव्यसंग्रह, पाच लेखसंग्रह शासनमान्य यादीत समाविष्ट झाले आहेत. कविता शहराच्या, मी यशस्वी होणारच..!,पैलू – प्रभावी व्यक्तिमत्वाचे, अस्वस्थ वळणावर, सोपे आहे आनंदाने जगणे, पालकांनो जागे व्हा, ही पुस्तके यादीत समाविष्ट आहेत. सरकारी अनुदानित वाचनालयांना शासनमान्य ग्रंथ शिफारस यादीतील पुस्तके खरेदी करणे बंधनकारक असते.
दरम्यान जीवन साळोखे यांची आजपर्यंत सुमारे पन्नास पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. त्यातील बव्हंशी पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. वाचन प्रोत्साहन आणि समृद्ध शालेय ग्रंथालय अभियान अंतर्गत त्यांचा ग्रंथदान उपक्रम सर्व जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. गेल्या दोन दशकांत त्यांनी शालेय ग्रंथालये आणि सार्वजनिक वाचनालयांना सुमारे पंधरा हजार पुस्तके ग्रंथभेट म्हणून दिली आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930