नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राज्यात स्वतंत्र आयुष मंत्रालय स्थापण्यासाठी प्रयत्न करणार : आमदार जयंत आसगावकर – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

राज्यात स्वतंत्र आयुष मंत्रालय स्थापण्यासाठी प्रयत्न करणार : आमदार जयंत आसगावकर

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

राज्यात स्वतंत्र आयुष मंत्रालय स्थापण्यासाठी प्रयत्न करणार

आयुर्वेद टीचर्स असोसिएशनच्या राष्ट्रीय परिषदेत आमदार जयंत आसगावकर यांचे प्रतिपादन

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, पुणे
केंद्राप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही स्वतंत्र आयुष मंत्रालय स्थापण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार जयंत आसगावकर यांनी केले. पुणे येथे आयुर्वेद टीचर्स असोसिएशनच्या सहाव्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ. रघुराम भट्टा, डॉ. कनोजिया, डॉ. रवी श्रीवास्तव, डॉ. दास उपस्थित होते.
प्रारंभी आयुर्वेद क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. चतुर्भुज भुयन, डॉ. प्रकाश खबरडे यांना आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते लाईफ टाईम अच्युमेंट पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
आमदार जयंत आसगावकर म्हणाले, आयुर्वेद टीचर्स असोसिएशनच्या मागण्यांसाठी आपण वेळोवेळी मंत्रालय स्तरावर प्रयत्न केले. दोन वेळा वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांसोबत बैठका घेतल्या. आयुर्वेद टीचर असोसिएशनचे जे प्रश्न आहेत, ते सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. राज्यात आयुष मंत्रालय स्थापन व्हावे, यासाठी सातत्याने मागणी होत आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930