नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , बदलापूर प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करावी : आमदार जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखाली शैक्षणिक व्यासपीठाच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

बदलापूर प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करावी : आमदार जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखाली शैक्षणिक व्यासपीठाच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

बदलापूर प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करावी : आमदार जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखाली शैक्षणिक व्यासपीठाच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
बदलापूर (ठाणे) येथील आदर्श विद्यामंदिरात दोन मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आमदार जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखालील कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
यावेळी बोलताना आमदार जयंत आसगावकर म्हणाले, बदलापूर येथे घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे. अशा घटना घडू नयेत यासाठी राज्य शासनाने प्रत्येक शाळेत सुरक्षेच्यादृष्टीने सुरक्षा कर्मचारी नेमावेत तसेच प्रत्येक वर्गात, स्टाफरूम आणि मैदान परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत. मुलींच्या सुरक्षितेसाठी राज्य शासनाने दोन वर्षांपूर्वी विशाखा समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. राज्य सरकार शाळांमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती करणार आहे. या भरतीला मी वेळोवेळी विरोध करत आलो आहे. या कंत्राटी कर्मचारी भरतीमुळे शाळेतील महत्त्वाचे दस्तावेज धोक्यात येणार आहेत. या पलीकडची गंभीर बाब म्हणजे आमच्या शाळेत शिकणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होणार आहे. या साऱ्या बाबींचा विचार करता शासनाने ही कंत्राटी भरती रद्द करून ती कायमस्वरूपी करावी. राज्य शासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन आरोपीला जबर शिक्षा देण्यात यावी तसेच घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा अशी मागणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी येडगे यांनी आपल्या सूचना राज्य शासनाला कळवू असे सांगितले. दरम्यान या घटनेचा कोल्हापूर शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. या शिष्टमंडळात कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड, शिक्षक नेते दादासाहेब लाड, खाजगी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पोवार, आर. वाय. पाटील, के. के. पाटील, उदय पाटील, राजेंद्र कोरे, बसवराज वस्त्रद, राजेश वरक, दिपक पाटील, संदीप पाटील यांच्यासह संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930