नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , स्वरधाराच्या ‘ठेवा आठवणींचा’ कार्यक्रमास रसिक श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : यानिमित्ताने ‘बिनाका गीतमाला’ कार्यक्रमाची आठवण – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

स्वरधाराच्या ‘ठेवा आठवणींचा’ कार्यक्रमास रसिक श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : यानिमित्ताने ‘बिनाका गीतमाला’ कार्यक्रमाची आठवण

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

स्वरधाराच्या ‘ठेवा आठवणींचा’ कार्यक्रमास रसिक श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : यानिमित्ताने ‘बिनाका गीतमाला’ कार्यक्रमाची आठवण

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
गारगोटीतील स्वरधारा संगीत विद्यालयाच्यावतीने बिनाका गीतमालाचे अमीन सयानी (आर.जे.) यांना श्रद्धांजली म्हणून ‘ठेवा आठवणींचा’ हा कार्यक्रम श्री.इंजुबाई सांस्कृतिक भवनमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमास रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्वरधारा संगीत विद्यालयाचे प्रमुख राम गव्हाणकर यांच्या पुढाकाराने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये स्वरधारा संगीत विद्यालयाच्या वतीने सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. कार्यक्रमाचे हे नववे वर्ष आहे.संगीत – कलाक्षेत्रातील मान्यवरांना या निमित्ताने आदरांजली म्हणून त्यांच्या आठवणींचा कार्यक्रम सादर केला जातो. यावर्षी अमीन सयानी निवेदन करत असलेल्या व अनेक दशके श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या ‘बिनाका गीतमाला’ या कार्यक्रमाच्या आठवणींचा भाग म्हणून हा कार्यक्रम सादर करण्यात आला. शायद मेरी शादी का खयाल, देखा एक ख्वाब तो ये, बिंदिया चमकेगी, जो वादा किया वो, अधीर मन झाले या गीतांच्या सादरीकरणाच्या माध्यमातून अमीन सयानींचा बिनाका गीतमाला कार्यक्रमाचा प्रवास, त्याच्या काही आठवणी या निमित्ताने जाग्या करण्यात आल्या. परदेसिया ही दुनिया माया जाल या गीतांनी कार्यक्रमात रंगत आणली. अमीन सयानी, पंकज उदास, सीमा देव, सुलोचना दिदीं या व इतर नामांकित कलाकारांबरोबर, गारगोटी व परिसरातील कलाश्री वसंत शिंदे, शिल्पकार एम.डी. रावण (मुरगूड) यांनाही आदरांजली वाहण्यात आली. ठेवा आठवणींचा या कार्यक्रमासाठी मंगेश सारंग (कीबोर्ड), विक्रम परीट (ढोलक, ढोलकी, काँगो), ज्ञानेश कोळी (तबला, बोंगो), रोहन मस्के (ऑक्टोपॅड) अशी साथ संगत लाभली. विनायक पोवार (सिद्धिविनायक साऊंड,निपाणी) यांची ध्वनी व्यवस्था होती.
स्वरधारा संगीत विद्यालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या संगीत परीक्षेत यश मिळवलेल्या साधकांना डॉक्टर के. ए.मोमीन, के.डी.सी.सी.बँकेचे संचालक व आबिटकर शिक्षण समूहाचे अध्यक्ष प्राचार्य अर्जुन आबिटकर, संतोषी ट्रेडर्सचे शहा, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शामराव देसाई, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष प्राचार्य मिलिंद पांगिरेकर, गारगोटीचे उपसरपंच सागर शिंदे, संगीतकार शिवराज पाटील, तबलावादक नरेंद्र पाटील, तानाजी सोनाळकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, पत्रकार शिवाजी सावंत, संजय मालंडकर, कुलदीप कामत, सुभाष देसाई, विश्वनाथ देसाई (नाना), मारुती लाड, रमेश कारेकर, संजय पिसे व कुटुंबीय, डॉ.राहुल व तन्वी गव्हाणकर (कुडाळ), ग्रा.पं.सदस्य रूपाली राऊत, सौ. रायजादे, श्रीमती पंडीतराव, श्रीमती सातोस्कर ,प्रदीप व जयदीप डाकरे, हरिदास देसाई, सुनील लोहार, एन.के.सुतार, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी मुकुंदआबा देसाई,सर्जेरावतात्या देसाई, सुमित पाडगावकर,अस्मिता गव्हाणकर, ऋषिकेश गव्हाणकर,सार्थक परुळेकर, ह.भ.प.बबन बेलेकर,दत्ता करवळ
यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक मालंडकर ज्वेलर्स,सह प्रायोजक सत्यम क्लॉथ स्टोअर्स व त्रिमूर्ती फर्निचर मॉल हे होते. कर्मा चित्रपटातील दिल दिया है जान भी देंगे…. या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. स्वरधारा संगीत विद्यालयाचे प्रमुख राम गव्हाणकर यांनी आभार मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031