नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , इतिहासावर आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमठवणाऱ्या महामानवांची जीवनचरित्रे वाचा : बी.के.गोंडाळ – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

इतिहासावर आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमठवणाऱ्या महामानवांची जीवनचरित्रे वाचा : बी.के.गोंडाळ

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

इतिहासावर आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमठवणाऱ्या महामानवांची जीवनचरित्रे वाचा : बी.के.गोंडाळ

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, राजापूर
महाविद्यालयीन काळ हा अत्यंत संवेदनशील व आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारा काळ असतो. या काळात जीवनध्येय गाठण्याच्या उद्देशाने वाटचाल करताना अभ्यासक्रमाच्या पुस्तकांबरोबरच अवांतर पुस्तके वाचने गरजेचे आहे. कारण अभ्यासक्रमाची पुस्तके जीवनदिशा देतील. पण अवांतर पुस्तके कसे जगायचे ते शिकवतील यासाठी काळाच्या इतिहासावर आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमठवणाऱ्या महामानवांची जीवनचरित्रे वाचा, असा विचार राजापूर तालुक्यातील ग्रंथालयीन चळवळीतील कार्यकर्ते बी. के. गोंडाळ यांनी मांडला.
राजापूर तालुक्यातील विखारे गोठणे येथील आबासाहेब मराठे महाविद्यालय मध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी बी.के.गोंडाळ प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते त्या वेळी उपस्थित विद्यार्थ्यांना आवाहन केले.
यावेळी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन बी. के. गोंडाळ याच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. ए. व्ही. भावे होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. आर. एस. भावले यांनी केले.
यावेळी बी. के. गोडाळ यांनी शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या पाच प्रती व मराठीतील निवडक १८०पुस्तकांची यादीच्या पंचविस प्रती उपस्थित विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. यावेळी डॉ. जी. डी. हराळे. डॉ. एच. एन. अकोलकर. डॉ. एस. आर. मेस्त्री. प्रा. ए. ए. लोंढे. प्रा. व्हि. डी. देवकर. प्रा. जी. बी. पवार. प्रा. जी. आर. कराडे. प्रा. राजेश वाघे. प्रा. प्रकाश कांबळे उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031