नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , चंदगड तालुक्यातील पंचवीस माध्यमिक शाळांना पाचशेहून अधिक दर्जेदार पुस्तके भेट देणार – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

चंदगड तालुक्यातील पंचवीस माध्यमिक शाळांना पाचशेहून अधिक दर्जेदार पुस्तके भेट देणार

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

चंदगड तालुक्यातील पंचवीस माध्यमिक शाळांना पाचशेहून अधिक दर्जेदार पुस्तके भेट देणार

ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यांची ग्रंथदान उपक्रमांतर्गत वाचन प्रेरणा दिनाच्या पार्श्वभूमीवर बहुमोल ग्रंथभेट

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, चंदगड
चंदगड तालुक्यातील पंचवीस माध्यमिक शाळा व ज्युनियर काॅलेजीस आणि एक सार्वजनिक वाचनालय यांना, ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार जीवन साळोखे हे आपल्या ग्रंथदान उपक्रमांतर्गत पाचशेहून अधिक वाचनीय, दर्जेदार पुस्तके देणार आहेत. चंदगड येथील खेडूत शिक्षण प्रसारक मंडळाच्या दी न्यू हायस्कूल व न.भु. पाटील ज्युनियर कॉलेजच्या सभागृहात हा ग्रंथदान समारंभ शुक्रवार २५ ऑक्टोबर रोजी दुपारी १.०० वा. उत्साहात संपन्न होणार आहे. दरम्यान अशा स्वरूपाचा ग्रंथदान कार्यक्रम जाहीररित्या चंदगड तालुक्यात प्रथमच संपन्न होत आहे.
संस्थेचे प्राचार्य डी. एन. देवळे यांचे अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ पत्रकार श्री.सुनिल कोंडुस्कर (चंदगड तालुका प्रतिनिधी, दै.सकाळ), डाॅ. आर. एन.गावडे यांचे प्रमुख उपस्थितीत हा ग्रंथदान समारंभ होणार आहे. यावेळी प्राचार्य जीवन साळोखे हे चंदगड तालुक्यातील पंचवीस माध्यमिक शाळांना प्रत्येकी दर्जेदार, वाचनीय वीस पुस्तकांचा संच, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या गाजलेल्या पाच कादंबऱ्यांचा एक खंड, ग्रंथालय शास्त्राचे जनक डाॅ.एस.आर.रंगनाथन यांची लॅमिनेटेड प्रतिमा आणि २०२४ चा साप्ताहिक साधनाचा दिवाळी अंक हे सर्व साहित्य एकत्रित भेट देणार आहेत.
दरम्यान लेखक संजय साबळे यांच्या “एपीजे अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायक विचार” या अभिनंदन प्रकाशन, कोल्हापूरने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी प्राचार्य जीवन साळोखे यांचे हस्ते होणार आहे.
गेली एकोणीस वर्षे सातत्याने “एकहाती ग्रंथदान उपक्रम” राबवणारे, प्राचार्य जीवन साळोखे यांनी आजपर्यंत जिल्ह्यातील शालेय ग्रंथालये व सार्वजनिक वाचनालयांना सुमारे पंधरा हजार पुस्तके भेट म्हणून दिली आहेत. २०२४ या वर्षात त्यांचा दोन हजार पुस्तके देण्याचा संकल्प जाहीर आहे. तसेच आण्णाभाऊ साठेंच्या पाच-पाच कादंबर्‍यांचे दोनशेहून अधिक खंड ते शालेय ग्रंथालयांना देणार आहेत.
समृद्ध शालेय ग्रंथालय अभियान आणि वाचन प्रोत्साहनासाठी ग्रंथदान असा हा उपक्रम प्राचार्य जीवन साळोखे हे प्रत्यक्ष कृतीतून एकहाती राबवत आहेत.
दरम्यान, जुलै- २०२४ मध्ये त्यांनी रुकडी परिसरातील माध्यमिक शाळांना हायस्कूल्स व वाचनालयांना पाचशेहून अधिक ग्रंथभेट दिली आहे. तसेच हातकणंगले तालुक्यातील, पेठ वडगाव विभागातील सतरा माध्यमिक शाळा व वाचनालयाना चारशेहून अधिक पुस्तके
“वाचन प्रेरणा दिनाच्या ” पार्श्वभूमीवर २१ ऑक्टोबर रोजी पेठ वडगाव येथे ग्रंथदान समारंभात ग्रंथभेट म्हणून दिली. प्रत्यक्ष “ग्रंथभेट” देवून ते वाचन प्रेरणा दिन साजरा करत आहेत…!
आजपर्यंत कागल, भुदरगड, राधानगरी, गडहिंग्लज,करवीर, पन्हाळा, हातकणंगले
तालुक्यासह इचलकरंजी शहरातील दोनशे पन्नासहून अधिक माध्यमिक शाळांना वेगवेगळ्या निमित्ताने प्राचार्य जीवन साळोखे यांनी ग्रंथभेट दिले आहेत.
विद्यार्थ्यांसह शिक्षक वर्ग अधिक वाचते होण्यासाठी हा उपक्रम यापुढेही जिल्ह्य़ात गतीने राबवण्याचा त्यांचा निर्धार असून त्यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांनी सक्रिय सहकार्य करावे, असे त्यांनी आवाहन केले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930