नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , कोल्हापूर जिल्हा डिजिटल मिडिया महिला आघाडीच्या अध्यक्षपदी सायली मराठे – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

कोल्हापूर जिल्हा डिजिटल मिडिया महिला आघाडीच्या अध्यक्षपदी सायली मराठे

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

कोल्हापूर जिल्हा डिजिटल मिडिया महिला आघाडीच्या अध्यक्षपदी सायली मराठे

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा डिजिटल मिडिया महिला आघाडीच्या अध्यक्षपदी सायली मराठे यांची निवड करण्यात आली. डिजिटल मिडिया संपादक, पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर येथे संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.
कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी भाऊसाहेब फास्के तर उपाध्यक्षपदी दिपक मांगले यांची निवड करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा डिजिटल मिडिया महिला आघाडी अध्यक्षपदी सायली मराठे, कार्याध्यक्षपदी प्रिती कलढोणे, उपाध्यक्ष अंजूम मुल्ला, सचिव संगिता हुबे यांच्या निवडी करण्यात आल्या. कोल्हापूर शहराध्यक्षपदी अझरुद्दीन मुल्ला तर उपाध्यक्षपदी विजय यशपुत्त यांची निवड करण्यात आली.
पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी सुहास पाटील तर संघटकपदी विनायक कलढोणे यांची निवड करण्यात आली.
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, उपाध्यक्ष सतीश सावंत, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले, राज्य संघटक तेजस राऊत यांच्या उपस्थितीत कोल्हापूर येथे एकमताने निवडी करण्यात आल्या.
पावणेचार वर्षांचा गारगोटीचा पत्रकारपुत्र गिर्यारोहक साम्राज्य इंद्रजित मराठे याचा कोल्हापूर डिजिटल मिडियाच्यावतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031