नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ग्रंथदान चळवळ ही लोकचळवळ म्हणून समाजात वाढावी : प्राचार्य जीवन साळोखे – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

ग्रंथदान चळवळ ही लोकचळवळ म्हणून समाजात वाढावी : प्राचार्य जीवन साळोखे

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

ग्रंथदान चळवळ ही लोकचळवळ म्हणून समाजात वाढावी : प्राचार्य जीवन साळोखे

गगनबावड्यात पद्मश्री डॉ.ग.गो.जाधव महाविद्यालयात जाहीर ग्रंथदान समारंभ संपन्न

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गगनबावडा
येथील पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या महाराष्ट्र शासन आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी निर्देशित केलेल्या कृतीकार्यक्रमांतर्गत दि. १६ जानेवारी रोजी, “जाहीर ग्रंथदान समारंभ” आयोजित करून या संकल्पाचा कृतीशील समारोप केला. आपल्या ग्रंथदान उपक्रमांतर्गत ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य जीवन साळोखे यांच्या दोन दशकाच्या या उपक्रमातून, यावेळी त्यांनी गगनबावडा तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, वरिष्ठ महाविद्यालये आणि शासनमान्य वाचनालयांना नियोजनपूर्वक ग्रंथभेट म्हणून प्रथमच अशाप्रकारे ग्रंथदान समारंभ झाला असून,यावेळी पाचशे दर्जेदार पुस्तके संबंधितांना प्रदान केली.
कार्यक्रमाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वराज्यरक्षक छ. संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमापूजन आणि दिपप्रज्वलनाने करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.टी एम पाटील होते.
यावेळी संयोजक प्रा. ए. एस. कांबळे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. या पंधरवड्यातील वाचनपूरक कार्यक्रमांचा सविस्तर आढावा घेतला.
उद्घाटन सत्रात आनंदी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव प्रा. डॉ. विद्या देसाई मार्गदर्शन करताना म्हणाल्या, “आपली सर्वांची वैयक्तिक, सामाजिक, भौतिक आणि आर्थिक उन्नती ही केवळ ग्रंथांमुळे आणि नियमित वाचनाने होते. हे जाणून आपण आपल्या पाल्यांच्या उच्च शिक्षणासाठी, प्रगतीसाठी वाचन प्रोत्साहनासाठी प्रयत्नशील असले पाहिजे”.
गटशिक्षणाधिकारी आर. आर. कुंभार म्हणाले “मानवी संस्कृती ही वाचनाने प्रगल्भ झालेली आहे, त्यामुळे वाचन आणि ग्रंथ यांच्याशीच आपण नेहेमी संलग्न राहिले पाहिजे”
प्रमुख पाहुणे, ग्रंथदाते, ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे म्हणाले, “ग्रंथप्रसार आणि वाचन चळवळ ही कोणा एकट्याची चळवळ नाही तर , समाजाच्या भल्यासाठी ती लोक चळवळ बनायला हवी. चांगली पुस्तकेच आपल्याला अभयदान देऊ शकतात. त्यामुळे सध्याच्या काळात होणारी ग्रंथांची उपेक्षा हीच अनेक सामाजिक समस्यांचे मूळ आहे. सुशिक्षित वर्गाकडून होणारी ही वाचनाची घोर उपेक्षा आणि दुर्लक्ष अक्षम्य आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तरी, तिच्या सन्मानासाठी मायबोली मराठीची होणारी उपेक्षा सर्वांनी सामुहिकपणे रोखली पाहिजे.”
अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील यांनी गगनबावडा तालुक्यातील शैक्षणिक परिस्थितीचा आढावा घेतला. ‘वाचन संकल्प’ कशासाठी करायचा? इथल्या मातीतून हिरे जन्मायचे असतील तर या मातीत रुजलेली शैक्षणिक चळवळ आपल्याला गतीमान करायला हवी, येथील विद्यार्थी जागतिक पटलावर न्यायचे असतील तर , खेड्यापाड्यात राहणाऱ्या सर्वसामान्य तरुणांनी उच्च शिक्षणाची कास धरली पाहिजे आणि त्यासाठी वाचन संस्कार आवश्यक आहेत, येत्या काळात या ग्रंथ चळवळीला अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आपण अग्रभागी आहोत याचे समाधान असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते संभाजीराव भालेकर (साळवण),मुख्याध्यापक आर.पी.चौगले,(शेणवडे-मणदूर),राहुल कांबळे ( बावेली) यांनीही आपल्या भाषणातून वाचन प्रोत्साहनाची आवश्यकता स्पष्ट केली.
कार्यक्रमात तालुक्यातील सहभागी सर्व शाळा, महाविद्यालयाच्या प्रतिनिधींना मान्यवरांच्या हस्ते ग्रंथदान करण्यात आले. यावेळी द. मो. पाटील कनिष्ठ महाविद्यालय तिसंगी, म. ह. शिंदे वरिष्ठ महाविद्यालय तिसंगी, शासकीय निवासी शाळा गगनबावडा, मा. उदयसिंह ऊर्फ बाळ पाटील माध्यमिक विद्यालय असळज, डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट फॉर शुगर अँड अप्लाईड प्रॉडक्टस् टेक्नॉलॉजी वेसरफ, श्री. संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय शेणवडे, मुरलीधर सार्वजनिक वाचनालय गगनबावडा, माध्यमिक विद्यालय सांगशी, श्रीराम हायस्कूल बावेली, माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय शेळोशी, लोकनेते उदयसिंह पाटील वाचनालय असळज, शासकीय आश्रमशाळा बोरबेट, परशुराम हायस्कूल व ज्यु.काॅलेज इत्यादी संस्थांचे मुख्याध्यापक, प्राचार्य आणि ग्रंथपाल उपस्थित होते. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतिश देसाई, माजी नायब तहसिलदार मा. अनंत कवळेकर, उपप्राचार्य डॉ. एस. एस. पानारी, प्राचार्य एच. एस. फरास उपस्थित होते. संयोजनात प्रा. वंदना पाटील, प्रा. आस्मा ए. जमादार, प्रा. आर. एस. कांबळे, प्रा. एस. एस. देसाई, प्रा. ए. आर. गावकर, प्रा. आर. आर. सरनोबत, प्रा. शितल ए. मोहिते, प्रा. ए. सी. कुंभार, प्रा. पि. बी. शिंदे आणि प्रा. आर. आर. नर यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. ए. जी. धामोडकर , आणि प्रा. एस. एस. घाटगे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. संतोष भोसले यांनी मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930