नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ‘व्हाट्सअप’ वरील शुभसंदेशांचे प्रसिद्ध झाले तीन विचार संग्रह…! – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

‘व्हाट्सअप’ वरील शुभसंदेशांचे प्रसिद्ध झाले तीन विचार संग्रह…!

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

‘व्हाट्सअप’ वरील शुभसंदेशांचे प्रसिद्ध झाले तीन विचार संग्रह…!

प्राचार्य जीवन साळोखे यांची वेगळीच हॅटट्रिक

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
वाचनाची आवड वाढून दररोज सकाळी- सकाळीच अनेक ग्रुप्सवरून आणि व्यक्तिगत परिचितांना सकारात्मक आणि प्रेरणादायक शुभसंदेश पाठवण्याचा एक आगळा छंद गेली अनेक वर्षे जोपासला आहे तो ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार जीवन साळोखे यांनी…! गेली सहा-सात वर्षे अखंडपणे ते अशाप्रकारे अत्यंत वाचनीय, प्रेरणादायक संदेश असंख्य लोकांना पाठवत आले आहेत. त्याला वाचकांचाही मोठा प्रतिसाद मिळत राहिला. विशेषतः कोरोना महामारीच्या काळात तर या दिलासादायक, सकारात्मक संदेशांनी अनेकांनी, आपल्याला नवी उमेद आणि जगण्यासाठी बळ मिळाल्याचे श्री. साळोखे यांना आवर्जून सांगितले. सोशल मीडियावरून प्रसारित होणाऱ्या या प्रेरणादायक शुभसंदेशांचे स्थायी स्वरूप राहावे, या उद्देशाने अनेक वाचकांच्या आग्रहातून “पहाटेची शब्दफुले” हा पहिला संग्रह २०२१ मध्ये प्रसिद्ध झाला.
त्यानंतर प्राचार्य जीवन साळोखे यांच्या दिलासादायक शुभसंदेश पाठवण्यात खंड पडला नाही. उलट अनेकजण हेच संदेश आपल्या अन्य संबंधितांनास पुन्हा-पुन्हा पाठवू लागले. परिणामी सोशल मीडियावर सकारात्मक, प्रेरणादायी विचारांचा सिलसिला सुरूच राहिला. खूप जण या संदेशांची सकाळी-सकाळी प्रतिक्षा करू लागले. तशा प्रतिक्रियाही अनेकांकडून व्यक्त होवू लागल्या.
त्यातूनच २०२३ मध्ये अशा प्रेरणादायक शुभसंदेशांचा “चैतन्यफुले” हा दुसरा, नवीन संग्रह प्रसिद्ध झाला. या संग्रहाचेही वाचकांनी उत्साहात स्वागत केले.
दरम्यान, श्री.साळोखे यांचे दररोज, नियमितपणे प्रेरणादायक, मार्मिक शुभ संदेश पाठवणे सुरूच होते. सोशल मीडियावर हे शुभ संदेश वाचणाऱ्यांची संख्याही सर्वदूर वाढत राहिली. परिणामी यापूर्वीच्या संग्रहाना वाचकांचा मिळालेल्या प्रतिसादामुळे, जीवन साळोखे यांच्या शुभसंदेशांचा तिसरा नवीन संग् नुकताच “विचारधन” हा [२०२३] प्रसिद्ध झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रकाशक अभिनंदन प्रकाशन यांनी हे तीनही संग्रह प्रकाशित केले आहेत. सुबक मांडणी, दर्जा आणि वाचनियतेमुळे वाचकांच्या पसंतीस हे सर्व संग्रह उतरले आहेत.
सोशल मीडियावरील प्रसारित लेखन अशाप्रकारे पुस्तक रूपात प्रकाशित होण्याचा हा योग दुर्मीळच म्हणावा लागेल.
शालेय ग्रंथालय, विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक या सर्वांसाठी हे तीनही संग्रह अत्यंत उपयुक्त असून वाचन, लेखन, श्रवण आणि संभाषण या चार मुलभूत भाषिक कौशल्यांना योग्य आकार देणारी ही पुस्तके आहेत, असे प्रतिपादन प्रकाशक त्रिभुवननाथ जोशी (कोल्हापूर) यांनी या पुस्तकासंदर्भात बोलताना केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031