नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर जीवन साळोखे यांची विविध विषयांवरील तीन पुस्तके प्रसिद्ध – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर जीवन साळोखे यांची विविध विषयांवरील तीन पुस्तके प्रसिद्ध

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर जीवन साळोखे यांची विविध विषयांवरील तीन पुस्तके प्रसिद्ध

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यांची विविध विषयांवरील तीन पुस्तके प्रसिद्ध होत असल्याची माहिती “अभिनंदन प्रकाशन,कोल्हापूर” चे प्रसिद्ध प्रकाशक त्रिभुवननाथ जोशी यांनी दिली.
त्यामध्ये सकारात्मक, आशावादी विचारांचा भावरम्य आविष्कार करणारा “आनंदी जीवनाचा राजमार्ग” हा ललित लेखसंग्रह, विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांना यथोचित मार्गदर्शन करणाऱ्या उदबोधक लेखांचा “विद्यार्थ्यांच्या यशस्वी जीवनाची मास्टर की..!” हा शैक्षणिक लेखसंग्रह तर सर्व स्तरातील वाचकमनं समृद्ध करणाऱ्या, चिंतनशील, प्रेरक विचारांचा बहुचर्चित “विचारधन” हा विचारसंग्रह समाविष्ट आहेत.
जीवन साळोखे यांच्या आजपर्यंत प्रसिद्ध झालेल्या सर्वच पुस्तकांना वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यानेच त्यांच्या अनेक पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत.
व्यक्तिगत आणि शालेय ग्रंथालयांसह सार्वजनीक वाचनालयांना ही सर्वच पुस्तके उपयुक्त आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031