नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत चैतन्य कांबळे प्रथम : वक्तृत्व स्पर्धा उत्साहात – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत चैतन्य कांबळे प्रथम : वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत चैतन्य कांबळे प्रथम : वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, मिणचे खुर्द
मिणचे खुर्द (ता. भुदरगड) येथे झालेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत चैतन्य कांबळे (कोळवण) या स्पर्धकास मिळाला. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक ऋतुजा पवार (इचलकरंजी) यांनी पटकावले तर हापसा तांबोळी (जयसिंगपूर), मयुरी कांबळे (गुडाळ), यश पाटील (मुंबई), मिथुन माने (सातारा) यांनी अनुक्रमे तृतीय, चतुर्थ व उत्तेजनार्थ क्रमांक मिळवले.
विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. संविधानाचा अमृत महोत्सव, दहशतवाद मानवतेचा शत्रू, तरुणांनो आता तरी जबाबदारी ओळखा, छ. संभाजी महाराज, संत साहित्य व सामाजिक फलश्रुती, लोकशाहीचे होतंय वस्त्रहरण, आजची शिक्षणापद्धती या सात विषयांची या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती.
या स्पर्धेसाठी स्नेहा देसाई, रूपाली परीट, डी. एस. देसाई , प्रकाश सोकासने, अदिती खानविलकर, सखाराम कांबळे व डी. एच. देसाई आदी देणगीदारांनी मोलाचे सहकार्य लाभले. यामध्ये अश्विनी देसाई, सलोनी देसाई, जयश्री खेगडे, सुवर्णा देसाई, किसन सोकासने, एस.आर. देसाई, ऋतुजा देसाई, सुप्रिया देसाई, भिकाजी कांबळे, रणजित आडके यांचा सत्कार झाला.
परीक्षक म्हणून बा. स. जठार, एस. के. पाटील, अस्मिता प्रधान यांनी काम पाहिले. माजी जि. प. सदस्य आर. व्ही. देसाई, शिक्षणाधिकारी बी. एम. कासार, शिक्षण मंचचे अध्यक्ष डी. एस. देसाई, डी. बी. नलवडे, सर्जेराव देसाई, महावीर पाटील, सचिन देसाई, एस. आर. देसाई, सरपंच जयश्री खेगडे, उपसरपंच सुवर्णा देसाई, सागर आडके, अरूण कांबळे, आर. डी. देसाई, मनिषा नलवडे, अर्चना देसाई, हिंदुराव खाडे उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031