नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , श्री.व्ही.जे.कदम यांना महाराष्ट्र शासनाचा ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार’ जाहीर – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

श्री.व्ही.जे.कदम यांना महाराष्ट्र शासनाचा ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार’ जाहीर

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

श्री.व्ही.जे.कदम यांना महाराष्ट्र शासनाचा ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार’ जाहीर

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, श्री.मौनी विद्यापीठाचे माजी सदस्य, लोकशाहीर अण्णाभाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, गारगोटीचे माजी उपसरपंच श्री.व्ही.जे.कदम यांना महाराष्ट्र शासनाचा ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
पुरस्कार वितरण राज्याचे मुख्यमंत्री नाम. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई येथे मंगळवार दि. १० जून रोजी स. १० वा. होणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री नाम.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री नाम.अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, सामाजिक न्याय मंत्री नाम.संजय शिरसाठ, सामाजिक न्याय राज्यमंत्री नाम.माधुरी मिसाळ, खास. अरविंद सावंत प्रमुख उपस्थित रहाणार आहेत.
श्री. कदम यांनी श्री.मौनी विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीवर कर्मचारी प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, बौद्ध विहार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष, दलितमित्र बी.डी.कांबळे फाउंडेशनचे अध्यक्ष, ज्ञानप्रबोधनीचे विश्वस्त म्हणून काम करतात. जय प्रकाश नारायण विकास सेवा संस्थेचे संचालक, यशवंत पाटील सहकारी नागरी पतसंस्था, कै.शंकर धोंडी पाटील सहकारी दूध संस्थेचे माजी संचालक, शाहू वाचनालयाच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून काम केले आहे.
आण्णाभाऊ साठे शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने समाजातील मागासवर्गीय
गरीब होतकरू मुलांसाठी ४ मागासवर्गीय
विद्यार्थी वसतिगृहे सुरु असून या वसतिगृहातून दरवर्षी १२५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. भुदरगड तालुक्यात भव्य बौद्ध विहार उभारण्यासाठी ५ गुंठे जागा घेण्यासाठी पुढाकार घेऊन राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून सामाजिक न्याय विभागाचा पाच कोटी रुपये निधी मिळवून घेतला.
१९८१ ते ८५ व सन १९९२ ते ९८ या कालावधीत गारगोटी ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून उत्कृष्ट काम केले आहे. या कालावधीत गरीब मागासलेल्या उद्योजकांना महात्मा फुले मार्केट बांधून दुकान गाळे अल्प किमतीत उपलब्ध करून दिले आहेत. गारगोटी येथे शेकडो बेघरांना जागा उपलब्ध करून देण्यात सक्रिय सहभाग घेतला आहे.
श्री.शाहू कुमार भवन या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक, वैज्ञानिक उपक्रम राबवले. भुदरगड तालुक्यात व्यसनमुक्ती चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी, अंधश्रद्धा निर्मूलन, भ्रष्टाचार मुक्ती आंदोलन, शेतकऱ्यांच्या आंदोलन या चळवळीत सक्रिय सहभाग राहिलेला आहे. तालुक्यातील विविध प्रश्नांवर, समस्यांवर, भ्रष्टाचार, अंधश्रद्धा निर्मूलन यावर परखड लिखाण केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या संजय गांधी निराधार व सहाय्य व इंदिरा गांधी भूमिहीन वृद्ध कमिटीवर अशासकीय सदस्य, विशेष कार्यकारी अधिकारी, भुदरगड तालुका साक्षरता अभियान समितीवर सदस्य, भुदरगड तालुका दक्षता समितीवर व शासकीय सदस्य म्हणून काम केले आहे. भुदरगड तालुका पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून सामाजिक उपक्रम, आरोग्य शिबिर, एड्स जनजागृती, रक्तदान शिबिर, शस्त्रक्रिया शिबिर इत्यादी उपक्रम राबवले आहेत.
या पुरस्कारकामी राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांचे सहकार्य लाभले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031