नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , साके येथे वारकरी दिंडी : आषाढी एकादशी निमित्त पारंपारिक वेशभूषेत सुभद्रामाता हायस्कूलचा उपक्रम – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

साके येथे वारकरी दिंडी : आषाढी एकादशी निमित्त पारंपारिक वेशभूषेत सुभद्रामाता हायस्कूलचा उपक्रम

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

साके येथे वारकरी दिंडी : आषाढी एकादशी निमित्त पारंपारिक वेशभूषेत सुभद्रामाता हायस्कूलचा उपक्रम

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कागल
आषाढी एकादशी निमित्त साके (ता.कागल) येथील कै.सौ.सुभद्रामाता हायस्कूलच्या वतीने भक्तीमय वातावरणात वारकरी दिंडीचे आयोजन केले. पाऊस , थंडी, वारा याची तमा न बाळगता विठ्ठल नामाचा गजर करत, पारंपरिक वेशभूषेत सज्ज झालेल्या विद्यार्थ्यांनी काढलेली ही दिंडी नागरिकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.
सकाळी ९ वाजता शाळेच्या प्रांगणातून  दिंडीला सुरुवात झाली. लहानग्यांपासून मोठ्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वच जणांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. डोक्यावर तुळशी वृंदावन, गळ्यात माळा, हातात टाळ-मृदंग आणि मुखात ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ चा अखंड जयघोष यामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता. अनेक विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकऱ्यांचा वेश परिधान केला होता, ज्यामुळे दिंडीला एक वेगळीच शोभा आली होती.
आषाढी एकादशीचे महत्त्व आणि वारकरी संप्रदायाची थोर परंपरा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने यावर्षी दिंडीचे आयोजन करण्यात आले असून यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची आणि परंपरेची ओळख होत असल्याचे मुख्याध्यापक दत्तात्रय ससे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी शाळेपासून गावच्या मुख्य मार्गावरून मार्गस्थ झाली. गावच्या विठ्ठल मंदिर येथे पांडुरंगाचे दर्शन विद्यार्थ्यांनी घेतले. रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेल्या नागरिकांनी दिंडीचे स्वागत केले. काही ठिकाणी नागरिकांनी दिंडीतील विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टीही केली.  
या दिंडीमुळे विद्यार्थ्यांना धार्मिक परंपरांची ओळख व सामाजिक एकोपा आणि शिस्त याचेही महत्त्व पटले. आषाढी एकादशीचा संदेश आणि वारकरी संप्रदायाचे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यात शाळेचा हा उपक्रम निश्चितच यशस्वी ठरला. यावेळी विठ्ठलाची वेशभूषा राधिका जाधव, रूक्मिणी नम्रता निऊंगरे, विणेकरी समर्थ सातुसे, ज्ञानेश्वर पृथ्वीराज पाटील,मुक्ताई अन्विता शेंडे या विद्यार्थ्यांनी वेशभूषा साकारल्या होत्या. दिंडीत शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, शाळा समिती,भजनी मंडळ, ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728