नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , निसर्गप्रेमींकडून वडाच्या झाडाचे पुनर्रोपण : मडीलगे खिंडीतील यशस्वी उपक्रम – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

निसर्गप्रेमींकडून वडाच्या झाडाचे पुनर्रोपण : मडीलगे खिंडीतील यशस्वी उपक्रम

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

निसर्गप्रेमींकडून वडाच्या झाडाचे पुनर्रोपण : मडीलगे खिंडीतील यशस्वी उपक्रम

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
विजेचा खांब, तारा, गटर व एका बाजूचा भराव खचल्याने निस्तेज झालेल्या साधारण १५ फूट उंच व ८ वर्ष वयाच्या वडाच्या झाडाचे पुनर्रोपण भुदरगड तालुक्यातील मडीलगे खिंडीतील भैरवाच्या मंदिराजवळ करण्यात आले शिवाय परिसरात गारगोटी कोल्हापूर रस्त्याच्या दुतर्फा २० आम्रवृक्षांचे रोपणही करण्यात आले.
दरवर्षी आपण पावसाळ्याच्या दिवसात नवीन झाडांचे रोपण करत असतोच पण पावसामुळे उन्मळून पडलेली, भराव खचल्याने अस्वस्थ असणारी जुनी झाडेही वाचवणे तितकेच महत्वाचे असते. हा हेतू घेऊन भुदरगड तालुक्यात अशाच १५ फूट उंच व ८ वर्ष वयाच्या झाडाचे दोन किलोमीटर प्रवास करत जेसिबी मशीनच्या सहाय्याने मडीलगे खिंडीतील भैरवाच्या मंदिरासमोर पुनररोपण करण्यात आले. झाडाची व्यवस्थित वाढ होण्यासाठी झाडाच्या मुळाशी बुरशीनाशकांचा वापरही करण्यात आला. सदर उपक्रमास निसर्गप्रेमी व स्थानिक नागरिकांचे विशेष सहकार्य लाभले.
याकामी पर्यावरणमित्र अवधुत पाटील, वृक्षमित्र सुखदेव मगदूम, संजय भोसले, डॉ.अर्जुन कुंभार, डी व्ही कुंभार, श्री.नंदकुमार मोरे, वनपाल काशिद, केमिस्ट असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव ढेंगे, ग्राहक मंच जिल्हा अध्यक्ष प्रशांत पुजारी, मानसिंग नाईक (खानापूर) पत्रकार शिवाजी सावंत, विनायक पाटील (नाधवडे), पक्षी अभ्यासक पर्यावरणमित्र अमोल शिरोडकर, एस के पाटील (आकुर्डे), दादासाहेब कुंभार, अजित यादव (दारवड), रोहित पोवार, धीरज भोसले, वाईल्ड फोटोग्राफर विजय पाटील, रमेश पाटील यांच्यासह असंख्य वृक्षमित्रांचे सहकार्य लाभले.

………………..
मडीलगे खिंड व भैरवनाथाचा परिसर कचऱ्याच्या विळख्यात आहे. प्लास्टिक बरोबरच खराब झालेले अन्न, घरातील निरुपयोगी वस्तू, औषधे -गोळ्या, बॉटल्स, मद्याच्या बॉटल्स, मेलेली जनावरे इथे टाकली जातात त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी जाणवते. भटक्या कुत्रांचा उपद्रवही आहे. नवीन झाडांच्या रोपणामुळे पर्यावरणप्रेमींचा वावर वाढून काही अंशी बदल नक्कीच घडेल अशी अशा आहे.
– अवधुत पाटील, पर्यावरणमित्र

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031