नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , गारगोटीत श्री.संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा ६७५ वा समाधी सोहळा संपन्न – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

गारगोटीत श्री.संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा ६७५ वा समाधी सोहळा संपन्न

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

गारगोटीत श्री.संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा ६७५ वा समाधी सोहळा संपन्न

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
गारगोटी येथे श्री.संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा ६७५ वा समाधी सोहळा उत्साहात संपन्न झाला.
सकाळी संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सौ.व श्री.संजय वामन वर्णे या दांपत्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ह. भ. प. सायली नाटले (भुमकरवाडी) यांच्या किर्तनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर समाजातील १० वी व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी समरजित संजय वर्णे, ऋषिकेश वर्णे, संस्कृती वर्णे यांचा प्रमाणपत्र व बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर नामदेव महाराजांचा पालखीचा सोहळा संपन्न झाला. यावेळी माऊली गीतावर समाजातील महिलांनी टाळाच्या तालावर रिंगण सोहळा हुतात्मा चौक, बाजारपेठ, व महादेव मंदिर येथे सादर केला समाजातील अनेक महिला यात सामील झाल्या होत्या.
विठ्ठल पंथी भजनी मंडळ हसूर दुमाला यांचे मिरवणुकीतील गीत सर्वांचे आकर्षण ठरले. दुपारी महाप्रसादाचे वाटप झाले.
यावेळी समाजाचे अध्यक्ष श्री सुरेश मिरजकर, उपाध्यक्ष दत्तात्रय उरुणकर, संजय पिसे, युवराज शिगांवकर, सुधीर वर्णे, संजय वर्णे, प्रताप पतंगे, प्रदीप वर्णे, अमोल मानकर, अमोल बोगाळे, उत्तम काकडे, अशोक काकडे,किरण पिसे, सचिन पिसे, सुहास महाडिक, दत्तात्रय शिगावकर, विजय कालेकर, मिलिंद मिरजकर, अजित मिरजकर, राजेंद्र वर्णे आदी बांधव उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728