नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शरद सहकारी सुतगिरणीच्या चेअरमनपदी श्री.बी.एस.देसाई (आण्णा) यांची तर व्हा.चेअरमनपदी श्री.अशोक फराकटे यांची निवड – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

शरद सहकारी सुतगिरणीच्या चेअरमनपदी श्री.बी.एस.देसाई (आण्णा) यांची तर व्हा.चेअरमनपदी श्री.अशोक फराकटे यांची निवड

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

शरद सहकारी सुतगिरणीच्या चेअरमनपदी श्री.बी.एस.देसाई (आण्णा) यांची तर व्हा.चेअरमनपदी श्री.अशोक फराकटे यांची निवड

सूतगिरणीच्या पहिल्या टप्यात १२५०० चात्यांचा प्रकल्प वर्षभरात कार्यान्वीत करणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
शरद सहकारी सुतगिरणी, आकुर्डे ता.भुदरगड जि.कोल्हापूर या सहकारी सुतगिरणीच्या चेअरमनपदी श्री.बाबुराव सर्जेराव देसाई यांची तर व्हा.चेअरमनपदी श्री.अशोक मारुती फराकटे यांची एकमताने निवड करण्यात आली. शरद सूतगिरणीच्या पहिल्या टप्यात १२५०० चात्यांचा प्रकल्प वर्षभरात कार्यान्वीत करणार असल्याचे पालकमंत्री नाम.प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
शरद सहकारी सुतगिरणीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. सुतगिरणीच्या चेअरमन वा व्हा.चेअरमन निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली होती. अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी तथा वस्त्रोद्योग विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त श्रीमती उज्वला पळसकर होत्या.
चेअरमन पदासाठी श्री.बी.एस.देसाई (आण्णा) यांचे नाव श्री.अर्जुन आनंदराव आबिटकर यांनी सुचविले तर श्री.सुभाष रामराव चौगले यांनी अनुमोदन दिले. व्हा.चेअरमन श्री.अशोक मारुती फराकटे यांचे नाव श्री.जयवंत तुकाराम चोरगे यांनी सुचविले तर श्री.संजय अनंत पाटील यांनी अनुमोदन दिले.
यावेळी श्री.अर्जुन आबिटकर, यशवंत केरबा नांदेकर, श्री.धैयशील शिवाजीराव भोसले, श्री.अशोक मारुती फराकटे, श्री.शहाजी गणपती देसाई, श्री.सुभाष रामराव चौगले, श्री. अनंत बळवंत पाटील, श्री.संजय अनंत पाटील, श्री रंगराव हरी मगदूम, श्री.अतुल बापूसो पाटील, श्री.जयवंत तुकाराम चोरगे, श्री.रामचंद्र कृष्णा शिऊडकर, श्री.दादासो विष्णू पाटील, श्री.उमाजी हिंदूराव पाटील, श्री.सुनिल परशराम जठार, श्री.बाळकृष्ण ज्ञानदेव भोपळे, श्री. महादेव कृष्णा,खोत, श्री.उमेश अशोक तेली, सौ.वैशाली विलास डवर, सौ.विजया दिलीप देसाई आदी संचालक उपस्थित होते. सभेचे नियोजन सहाय्यक निवडणूक अधिकारी एम.एम.नरुटे, अवधूत परुळेकर यांनी केले.
निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार राज्याचे आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना ना.आबिटकर म्हणाले शरद सहकारी सूतगिरणी अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारीत उभारण्याचा मानस असून पहिल्या टप्यात १२५०० चात्यांचा प्रकल्प कार्यान्वीत करण्यात येणार आहे. या सूतगिरणीच्या माध्यमातून युवकांना रोजगाराची संधी देण्याबरोबर अत्याधुनिक औद्योगिक प्रकल्पाचे तालुकावासीयांचे स्वप्न साकार होणार आहे.
यावेळी ज्येष्ठ नेते केजी नांदेकर, कल्याणराव निकम, दत्ताजीराव उगले, नंदकुमार सूर्यवंशी सरकार, अरुण जाधव, जालंदर पाटील, अंकुश चव्हाण, सूर्याजी देसाई, अशोकराव भांदिगरे, निवासराव देसाई, शिवाजी ढेंगे, संदिप व्हरंडेकर, विजय बलुगडे, संग्रामसिंह सावंत, संजय पाटील भादवण, तानाजी चौगले राधानगरी, डॉ. सर्जेराव कवडे, अमित देसाई यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930