नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , नुमविमध्ये शालांत पारितोषिक वितरण समारंभात ३० यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

नुमविमध्ये शालांत पारितोषिक वितरण समारंभात ३० यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

नुमविमध्ये शालांत पारितोषिक वितरण समारंभात ३० यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
दि प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीच्या मिरजकर तिकटीजवळील नुतन मराठी विद्यालय हायस्कूलमध्ये ३० यशवंत विद्यार्थ्यांचा शालांत पारितोषिक वितरण समारंभात सत्कार करण्यात आला. सोसायटीचे चेअरमन डॉ.सुनील कुबेर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभाला कोल्हापूर मधील प्रसिद्ध त्वचा विकारतज्ञ डॉ. सचिन कुलकर्णी हसुरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी नियामक मंडळाचे व्हा.चेअरमन मिलिंद करमळकर, शाळा समितीचे चेअरमन प्रकाश मेहता,संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य उदय सांगवडेकर ,सदस्य प्रशांत कुलकर्णी , संस्थेच्या कार्यवाह शरयू डिंगणकर, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
स्वतःल सिद्ध करण्यासाठी स्वतःला संधी द्या. कठोर परिश्रमाला पर्याय नाही.कष्ट हीच यशाची गुरुकिल्ली आहे, असे मत प्रमुख अतिथी डॉ.सचिन कुलकर्णी यांनी अतिथी मनोगतात व्यक्त केले. डॉ.सुनील कुबेर यांनी अध्यक्षीय समारोप केला.
यावेळी माध्यमिक शालांत परीक्षेसह शाळेतील पाचवी ते नववीपर्यंतच्या वार्षिक परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. धनश्री बेदरे ,आदिनाथ मुनीश्वर, राहत मौलवी या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून प्रशाला व शिक्षक यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक धनंजय बेदरे यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय जिमखाना प्रमुख रश्मी भागवत यांनी करून दिला. यादी वाचन सुहासिनी शेरखाने यांनी केले. समारंभ प्रमुख संजीवनी देशपांडे यांनी आभार मानले. तर सूत्रसंचालन पल्लवी कुलकर्णी यांनी केले. यावेळी दाते, पालक, शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031